

महागाव प्रतिनिधी :-संजय जाधव
महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील शेतकरी पांडूरंग आंडगे १ मे महाराष्ट्र दिनापासून पांदन रस्त्यासाठी आमरण उपोषण करत होते परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे त्यांना तब्बल आठ दिवस उपोषण सुरू ठेवावे लागले शेवटी आज दिनांक 8 मे रोजी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड व महसूल प्रशासनाच्या पथकाने संबंधित शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पांदन रस्त्याची पाहणी करून शेतकऱ्याला एक महिन्याच्या आत पांदन रस्ता अतिक्रमण मुक्त करून देण्याचे व उभ्या असलेल्या ऊस पिकाचे नुकसान भरपाई देण्याचे तसेच या प्रकरणांमध्ये ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हलगर्जी पणा केला त्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन सुद्धा दिले आहे उपोषणाची सांगता करताना उपविभागीय अधिकारी उमरखेड श्री व्यंकट राठोड .महागांव उमरखेड विधानसभेचे आमदार श्री नामदेव ससाने . जगदीश पाटील नरवाडे . अमृतराव देशमुख .
दीपक आडे .संदीप ठाकरे . राजु भाऊ धोतरकर .गोविंदराव देशमुख .शिवानंद राठोड .सचीन ऊबाळे. यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते
