
सहसंपादक -रामभाऊ भोयर
आदिवासी बांधवाचा देव उत्सव गेल्या काही दिवसा पासून सुरू आहे. अशातच काल वर्धा नदीवर देवाना आंघोळ घालण्याचा अंतिम दिवस होता. त्यामुळे आदिवासी समाज बांधव वर्धा नदीवर सामूहिक पद्धतीने अंघोळीसाठी गेले असताना यापैकी तिघे भाविक नदी पत्रात उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोलवर वाहवत गेले. याच क्षणी उपस्थित असणाऱ्या काही भाविकांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला असता दोघांना वाचविण्यात यश आले तर एक नदीपत्रात वाहून मृत्यू पावला.ही घटना यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्याना जोडणाऱ्या जोड सावंगी संगमावर घडली आहे. मारेगाव तालुक्यातील सावंगी येथे वर्धा आणि वना नदीचा संगम आहे. अनेक जण धार्मिक संस्कार करण्यासाठी या संगमावर येत असतात. वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ अशा तीन जिल्ह्यांची सीमा या संगमावर आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दिंदोड़ा घाटावर वरोरा तालुक्यातील बामर्डा येथील आदिवासी समाज बांधवाचे देवकार्य होते. गावातील सर्व समाज बांधव देव आंघोळ घालण्यासाठी येथील संगमावर जमलेले होते. या कार्यक्रमात मारेगाव तालुक्यातील कोसारा येथील येडमे कुटुंबीयही सहभागी झाले होते. वर्धा नदीच्या संगमावर हे भाविक देव आंघोळीसाठी पाण्यात उतरले. या पैकी तिघे भाविक गटांगळ्या खातअसताना त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला. या शर्थीच्या प्रयत्नात दोघांना बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र विवेक उर्फ विकास अमर येडमे 20 याचा ऐन वेळी हात सुटल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला असता प्रशासनाने शोध घेतला असता तो मृत अवस्थेत सापडला. बातमी लिही पावसतो त्याच्या मृत शरीराला शवविच्छेदनासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले होते. विवेक उर्फ विकास येडमे च्या मृत्यूने येडमे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्या तरुण युवकाच्या मृत्यूने कोसरा गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
🔸अवकाळी पाऊस व अवैध रेती उपसाने केला घात
मागील आठ ते दहा दिवसापासून सर्वत्र सुरु असलेल्या अवकाळी पाऊसा मुळे पाण्याची पातळी वाढली आहे नदी नाल्याना पूर सदृश्य परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे देवाची आंघोळ करताना नदीमध्ये उतरलेल्याना भाविकांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने हा प्रकार घडला असल्याची चर्चा आहे. तसेच रेतीच्या अवैध उपस्याने जागोजागी खड्डे पडलेले आहे त्यामुळे आंघोळीला जाणाऱ्या व्यक्तींना पाण्याचा अंदाज येत नसल्याने असे दुर्दैवी प्रसंग घडत असल्याचेही सांगितले जाते.
सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना शून्य
दरवर्षी आदिवासी बांधव वैशाख पौर्णिमेच्या आदल्या दिवश किंवा दिवसावर कुलदैवत महोत्सव आयोजित करतात देवाची आंघोळ ते नदीपात्रा करून दुसऱ्या दिवशी देव थंड करून गावाशेजारील मोहाच्या झाडावर ठेवतात ही परंपरा आहे. असे असताना मात्र गेल्या काही दिवसा पासून अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात कहर केला असून पाण्याची पातळी नेहमी पेक्षा वाढली आहे. हा समाज बांधव पारंपरिक पद्धतीने नदीवर येऊन आघोळी करतात याची जाणीव ठेवून सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासना कडून उपाय योजना करणे गरजेचे होते मात्र तसे न केले गेल्याने अनर्थ घडल्याची शक्यता आहे.
