गरीब,निराधार ,वृद्ध रुग्णांना आधार ठरत आहे भाविक भगत , 24 तास रुग्णांसाठी तत्पर

लोकहीत महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी. संदीप जाधव

समाजामध्ये रोगी किंवा अपघात केसेससाठी कुठलाही संविधानिक पद नसताना सुद्धा जनतेच्या सेवेसाठी भाविक भगत हे निस्वार्थपणे आधीपासूनच कार्य करत आहेत. एखादा रुग्ण पाठवला तर तो रुग्ण डिस्चार्ज होईल तोपर्यंत त्या रुग्णाला सेवा पूरवितात. कुठलाही स्वार्थ न बघता, राजकीय स्टंट न करता दिवस रात्र भाविक भाऊ मतदारसंघांमध्ये कार्य करत आहे. ज्यांचं नाही कुणी त्यांचे आम्ही या तत्त्वावर भाऊ काम करतात. किती वाजता रात्री बेरात्री किती वाजता फोन केला तरी पेशंट पाठवला तरी तात्काळ हजर राहणारे त्यामुळे ज्यांना कुठलाही आधार नाही अशा रुग्णांना आधार देण्याचे कार्य करतात.

उमरखेड व महागाव मतदार संघातील 60 टक्के गावांमध्ये हेल्प फाउंडेशन ची शाखा स्थापन झाले आहे. कुठलाही राजकीय स्टंट शो बाजी न करता निस्वार्थपणे सेवा करीत आहे. मतदारसंघातील गरीब लोकांची सेवा करून रुग्णसेवक व जनसेवक या नावाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. डिलिव्हरी ,अपघात यासारख्या बाबतीत निस्वार्थपणे रुग्णांची सेवा करण्याचे अहोभाग्य आम्हाला आम्हास लाभले गरीब गरजू लोकांना मदत करून वंचित घटकांना न्याय मिळवून देणे हेच फाउंडेशनचे काम आहेत.
श्री. भाविकजी दिनबाजी भगत जन्म 13 नोव्हेंबर 1975. जन्मस्थळ लेवा महागाव तालुका येथे झाला. 2005 मध्ये भारतीय जनता पार्टीचे सदस्य बनले व सन 2005 ते सन 2009 स्थानिक पातळीवर पक्षांच्या मजबुती करण्यासाठी पक्ष संघटक वाढवण्याचे कार्य केले. 2010 मध्ये सरचिटणीस पद 2011 मध्ये भाजपा बूथ प्रमुख 2012 भारतीय जनता पार्टी आघाडी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती 2013 जिल्हाप्रमुख कार्यालय जिल्हा प्रसिद्धीप्रमुख 2015 राळेगाव विधानसभा कळंब तालुकाप्रमुख मतदारसंघ पिंजून काढला. 2016 बाबुळगाव निवडणूक मंडळाध्यक्ष 2017 वणी विधानसभा नोंदणी प्रमुख व पांढरकवडा नगर परिषद प्रभारी म्हणून पक्षाकडून नियुक्ती. अशी कारकीर्द भाऊंनी गाजवली.