त्या पळसकुंडच्या बोगस बंगाली डाॅक्टरवर कारवाई करणार तरी कोण ?

सहसंपादक -रामभाऊ भोयर

राळेगाव तालूक्यात काही वर्षांपासून बंगाली डाॅक्टरांनी आपले थैमान मांडले आहे. यांच्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नसतांना यांनी आपले तालुक्यातील काही गावामध्ये भाडेतत्त्वावर दवाखाने उघडले आहे. दोन महिन्यापुर्वी खैरी येथील दोन डाॅक्टरावर राळेगाव तालूका आरोग्य अधिकारी यांनी कारवाई केली व साहित्य जप्त करून वडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोग्य अधिकारी यांनी तालुक्यातील एकाही ठिकाणी कारवाई करताना दिसत नाही हा प्रश्न उपस्थित केला जात आहे अशातच राळेगाव तालुक्यातील सावरखेड परिसरातील पळसकुंड येथे डाॅक्टराने चांगलेच आपले थैमान मांडले आहे. सावरखेड परिसर हा आदिवासी एरिया आहे या एरियामध्ये गोरगरीब शेतकरी तसेच शेतमजूर यांची तपासणी करताना दिसत आहे अनुभव नसतात सुद्धा पेशंटला सलाईन, इंजेक्शन, दवाई दिल्या जात आहे. विशेष म्हणजे हा बोगस डाॅक्टर राळेगाव तालुक्यातील एका पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे समजते आणि त्या पक्षाच्या भरोशावर हा सावरखेड परिसरात आपला दवाखाना उघडून उपचार करतांना दिसत आहे म्हणून हा बंगाली डाॅक्टर कुणालाही न भिता आपला व्यवसाय चालवत आहे. तालुक्यातील कोनत्या गावामध्ये किती बंगाली डाॅक्टर आहे हे तालूका अधिकारी यांना माहीत असून सुद्धा पळसकुंड येथील त्या डाॅक्टरावर कारवाई का केली जात नाही आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे तालुका आरोग्य अधिकारी यांना संपूर्ण माहिती असताना सुद्धा कारवाई करण्यात दिरंगाई होत केली जात यवतमाळ जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज भासत आहे.