रेती अभावी घरकुलाचे बांधकाम रखडले,बांधकामासाठी रेती उपलब्ध करून घ्या!

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यात रेती घाटांच्या प्रक्रिया रखडल्याने एकिकडे रेतीची चोरी वाढली तर दुसरी कडे तुटवडा निर्माण झाला आहे. लाभार्थींना घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी रेती
मिळत नसल्याने त्यांची फरपट
होत असुन अनुदानाची रक्कम ही मीळवीन्यासही अडचणी येत असल्यांची माहिती लाभार्थींनी दिली.त्यामुळे प्रशासनाने आपल्याला रेती उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत राळेगाव तालुक्यातील पात्र कुंटुबाना घरकुले मंजुर
करन्यात आली आहेत मंजुर लाभार्थींनी अनेक घरकुलाचे बांधकाम सुरु केले आहे रेती अभावी बांधकाम करने शक्य
नाही रेतीघाटांमधुन रेती ची ऊचल करन्यास प्रतिबंधक घातल्याने रेती आनायची कुठुन, असा प्रश्न निर्माण झाला आहे चोरट्या मार्गाने ऊचल केलेली रेती खरेदी केल्यास ती भरमसाठ दराने खरेदी करावी लागत असल्याचे अनेक लाभार्थींनी सांगीतले.त्यातच प्रशासनाने
राळेगाव तालुका परिसरातुन
धर्मापुर,मुधापूर वाऱ्हा,आष्टा बोरी रोहनी,येवती पारडी, झुल्लर,
वाहणार्या नदीवरील या घाटांमध्ये मुबलक रेती साठा उपलब्ध आहे. परंतु तालुक्यातील अनेक घाटांचे लिलाव करन्यात न आल्याने
जिल्हा प्रशासनाने या घाटांमधुन रेती चा उपसा करन्यास प्रतिबंधक घातला आहे. या भागात रेती ची चोरी मोठ्या प्रमाणात सुरु आहे ती रेती ६ ते ७ हजार रुपये प्रती ब्रास दराने खरेदी करावी लागत असल्याने ते गरीब लाभार्थींना आर्थिकदृष्ट्या परवडण्याजोगी नाही हा संपुर्ण प्रकार महसुल विभागातील लहान कर्मचाऱ्यांन पासुन ते मोठ्या अधिकार्यांन पर्यंत सर्वांना माहिती आहे.मात्र कुणीही बोलायला व काही करायला तयार नाही.असा आरोप घरकुल लाभार्थ्यांनी केला आहे.

अनुदान मिळन्यास अडचणी

एक लाखात घराचे बांधकाम शक्य आहे का?

बांधकाम साहित्याचेदर कमालीचे वाढल्याने १ लाख ५० हजार रुपयांचे घराचे बांधकाम करने शक्य नाही. त्यातच घरकुल बांधकाम करण्यासाठी चढया दराने रेती खरेदी करावी लागते. केवळ रेती खरेदी करन्यासाठी किमान ३० ते ४० हजार रुपये किंवा त्या पेक्षा अधिक रक्कम खर्च होत असल्याग्रामीण भागातील लाभार्थींना सरकारकडून घरकुले बांधकाम करण्यासाठी अनुदान म्हणून प्रत्येकी १ लाख ५० हजार रुपयांचा निधी दिला जात असतो. लाभार्थी घरांचे जसेजसे बांधकाम करते .तसतसी अनुदानाची रक्कम लाभार्थीच्या खात्यात जमा केली जाते ..तांत्रिक कारनामुळे बांधकाम थांबल्यास अनुदान ही थांबविले जाते. रेती अभावी अनेकांच्या घरकुलांचे बांधकाम थांबले आहे. यात लाभार्थीचा कोनता ही दोष नसतांना त्यांचे अनुदान थांबविण्यात येण्याची शक्यता बळावली आहे.ने ऊर्वरित १ लाख रुपयांमध्ये घराचे बांधकाम करणे शक्य आहे काय, असा प्रश्न लाभार्थींनी प्रश्न उपस्थित केला.

शरद सराटे ग्रामपंचायत सदस्य वडकी

रेतीघाटांतुन रेतीचा उपसा करन्यावर बंधी असल्याने घरकुल लाभार्थींना रेतीचा तुटवडा जाणवत आहे. त्यांना नियोजित काळात घरकुलांचे बांधकाम
करने अनिवार्य असते. बांधकाम रखडल्यास अनुदान मीळन्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे सरकारने या लाभार्थींना रेती उपलब्ध करुन द्यावी

अमोल जिवतोडे घरकुल लाभार्थी वडकी

मला घरकुल मिळालं मात्र रेती अभावी माझ्या घरकुलाचे बांधकाम गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे.चोरीची रेती परवडत नसल्यामुळे घेणे शक्य नाही,त्यामुळे प्रशासनाने स्वस्त दरात रेती उपलब्ध करून द्यावी जेणेकरून आमचे घर बांधकाम होऊन घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार.