सैनिक पब्लिक स्कुल च्या सुपिक वरफडे चे सुयश ,९१ टक्के गुण घेवुन शाळेत प्रथम क्रमांक

सहसंपादक -रामभाऊ भोयर

सिबीएसई दहावीच्या परीक्षेत वडकी येथील सैनिक पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे.
सिबीएसई दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असुन त्यामध्ये राळेगाव तालुक्यातील वडकी येथील सैनिक पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर नेत्रदीपक यश मिळविले. यात सुपीक वरफडे या विध्यार्थ्याने शाळेचे, गावाचे व पालकांचे नाव उंचावले. त्याला 91 टक्के गुण मिळाले असून शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मानकरी तो ठरला. विशेष म्हणजे सुपीकला वडील नाहीत. वडिलांच्या निधनानंतर आई व आजोबा, मामांनी त्याचे पालणपोषण केले
सैनिक पब्लिक स्कुल ने यशाची परंपरा यंदा ही कायम राखली. सुपीकने शाळा, शिक्षक व आईवडिलांचे नाव उज्ज्वल केले आहे. शाळेतील सुपिक राजेंद्र वरफडे हा विद्यार्थी ९१टक्के गुण घेवुन शाळेतुन प्रथम आला. कु. सुहानी जयवंत शिंदे हिने ९०.६०टक्के गुण घेत द्वितीय क्रमांक तर राम विनोद बोंबले या विद्यार्थ्याने ८८.६०टक्के गुण मिळवुन तृतीय क्रमांक मिळविला आहे .विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व आपल्या आईवडिलांना दिले आहे.