मथुरानगर जेवली येथे भाविक भगत यांचा सत्कार

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण)

यवतमाळ जिल्ह्यामधील संपूर्ण परिसरामध्ये गावोगावी आज भाविक भगत भाऊ याचा कारकीर्द विषयी चांगलीच कौतुक नागरिकांकडून होत आहे.आज मथुरानगर (जेवली )येथील परिसरामधील नागरिकांनी मार्गदर्शक अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्त्व , कुशल संघटक, रुग्णाचे कैवारी श्री. भाविक भगत यानी मथुरानगर (जेवली )येथे स्वतः येत भेट घेतली त्यावेळी श्री.रावसिंग साबळे, श्री रामसिंग ब्राह्मण, श्री.बंडू खरवडे. श्री गोविंद पुगुलवाद.श्री अनुप शेखावत. श्री प्रमोद राठोड,व इतर कार्यकर्ते उपस्तित होते. त्यावेळी जेवली येथील. सरपंच.श्री भेरलाल साबळे यानी भाविक भाऊ भगत यांचे यवतमाळ जिल्ह्यात गोरगरीबा साठी जे रात्रंदिवस 24 तास सेवा करीत आहे त्यांच्या कारकीर्द विषयी त्यांनी जेवली परिसरातील नागरिकासमोर भाषण केले.व तसेच जेवली परिसरातील नागरिकांनी भाविक भगत भाऊ यांचा आदरपूर्वक सन्मान करून त्यांचा सत्कार केला.