
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ
ढाणकी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक असून या ठिकाणावरून शहरात जाण्यासाठी मार्ग निघतो या ठिकाणी असलेल्या नालिवरील पुलाला खूप मोठा खड्डा पडला असून त्याला नीट व व्यवस्थित करण्याची जबाबदारी नेमकी कुणाची हा प्रश्न व संभ्रम उपस्थित होत असल्यामुळे सदर जाणाऱ्या येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनाची फट फजिती त्रेधातिरपीट होताना दिसत आहे.
पुलावरील खड्डा पडलेल्या ठिकाणी येणाऱ्या काळात अपघात सुद्धा होऊ शकते पण नगरपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. बहुदा पुलावरील जो खड्डा आहे तो भाग प्रभागाच्या सीमेवरून आडला आहे का ??की इथ पण हद्द सीमावाद सुरू होत आहे ?? हा सुद्धा मुख्य प्रश्न येणाऱ्या जाणाऱ्या पादचारी यांना पडतो. या प्रभागांमध्ये अनेक दिवस सत्ता उपभोगलेले मातब्बर नेते असताना अशा पद्धतीने जर साध्या पूलावरील पडलेल्या खड्ड्याला नीट करण्यासाठी एवढा वेळ लागत असेल तर कुठेतरी जनतेबद्दलचे व मतदारांनी दिलेल्या मताचा आदर लोकप्रतिनिधींना आहे का जर प्रभागाच्या सीमेवरून हे काम रखडले असेल तर मतदानाच्या वेळेस लोकप्रतिनिधी एका एका मतदातांना शोधून काढतात मग हा प्रश्न सोडवण्यासाठीच का बरं वाट पाहावी लागत असेल विशेष म्हणजे काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला त्यामुळे शेतकरी शेतमजूर वर्गाची वर्दळ वाढेल तसेच पाऊस पडल्यानंतर त्या पडलेल्या खड्ड्यात पाणी साचल्यानंतर खड्ड्याचा अंदाज घेता येणार नाही परिणामी दुचाकीस्वार, पादचारी, खड्ड्यात पडून अपघात सुद्धा घडू शकतो. पण साध्या लहानशा पडलेल्या भगदाडाला बुजवण्यासाठी हेवेदावे किंवा प्रभाग रचनेची सीमा आड येत असेल तर हे जनतेच्या दृष्टीने दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. टेंभेश्वरनगर मधील लोकांना या चौकातूनच बाजार व राशन कार्डवरील माल आणण्यासाठी जावे लागते वयोवृद्ध माणसे घरातील कर्ता पुरुष कामाला गेल्यानंतर राशन व इतर कामे करत असताना त्याचा पाय त्या पडलेल्या खड्ड्यात जाऊन जबर जखम होऊन अपघात होऊ शकते. तसेच पुलावरील उघडपणे दिसत असलेल्या लोखंडी जाळीवरून तेथे अपघात झाल्यास जखमेची तीव्रता गंभीर होऊ शकते हे निदर्शनास येते पण एवढे असताना नगरपंचायत प्रशासन अपघात झाल्यानंतर हरकतीत मध्ये येणार का?? तसेच काही दिवसाने शैक्षणिक वर्ष सुरू होणार असून काही अंतरावर शाळेची मोटार गाडी थांबते त्यामुळे अनेक पालक आपल्या पाल्यांना या चौकामधून आणून सोडतात त्यामुळे येणाऱ्या काळात मोठी दुर्घटना टाळावयाची असल्यास संबंधित पुलावर अच्छादन घालून दुरुस्ती होणे गरजेचे आहे असे सर्वसामान्य सुज्ञ नागरिकांना वाटत आहे.
