
सहसंपादक : रामभाऊ भोयर
खैरी वडकी व खैरी कोसारा रस्त्यावर बेंबळा कालवा गेल्याने बांधण्यात आलेल्या पुलावरील बाजूचे भराव व्यवस्थित न झाल्याने या सर्व पुलावरील दोन्ही बाजूला खड्डे पडले आहे. खैरी कोसारा व वडकी या मार्गावर कोळसा रेतीची अवजड वाहतूक सतत चालू असते तसेच इतर वाहनाची खूप वरदड असते त्यामुळे या पुलाच्या बाजूला पडलेल्या खड्ड्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या बाबीकडे मारेगाव व राळेगाव बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसते.
खैरी कोसारा वडकी या राज्य मार्गावरील रोड मधून बेंबळा प्रकल्पाचे कालवे गेल्याने त्यावर पूलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र खैरी ते कोसारा व खैरी ते वडकी ह्या रोडवर बांधलेले पुलाचे काम सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचे होते. पुलाचे बांधकाम होऊन त्यावर वाहतूक चालू झाली असता अवघ्या एक ते दोन महिन्यातच ह्या सर्वावरील पुलाच्या बाजूने खड्डे पडले होते. त्याची बातमी सुद्धा दैनिक पुण्यनगरीने प्रसिद्ध केली होती त्यावेळेस राळेगाव व मारेगाव या दोन्ही बांधकाम विभागाने त्यावेळी तात्पुरती डागडूजी करून ह्या रोडवर मलमपट्टी केली होती. आता ह्या पूलाचे बांधकाम होऊन एक ते दीड वर्षाचा कालावधी लोटला परंतु एवढ्याच कालावधीत ह्या रोडच्या बाजूला खड्डे पडले असून पुलाच्या स्लॅब च्या बाजू ला सळकीचे पिंजरे टाकून जो स्लॅब टाकला होता त्याच्या सळाकी सुद्धा उघड्या पडल्या असून खड्डे पडले आहेत.
ह्या मार्गावरून कोळसा रेतीची नेहमी अवजड वाहतूक चालू असते वही वाहतूक नेहमी भरधाव चालत असते . त्यामुळे ह्या रोडवर केव्हा मोठा अपघात होईल हे सांगणे कठीण आहे. मात्र राळेगाव व मारेगाव बांधकाम विभागाने पूल बांधणी करतेवेळी झालेल्या निकृष्ट कामाकडे लक्ष दिले असते तर ह्या फुलांचे बांधकाम व्यवस्थित झाले असते व आज रोजी हे खड्डे पडले नसते. यामुळे ह्या रोडच्या पुलावरील बांधकामाकडे दोन्ही बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच आज या पुलाच्या आजूबाजूला खड्डे पडले असून त्यामुळे होणारे अपघातची जबाबदारी राळेगाव व मालेगाव बांधकाम विभाग घेणार का असा प्रश्न वाहन चालक व नागरिकाकडून होताना दिसत आहे.
त्या पुलावरील, जवळील खड्ड्यामुळे वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसून या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम राळेगाव व मारेगाव विभागाने लक्ष केंद्रीत करून पूलाच्या स्लॅबच्या बाजूकडील काम व्यवस्थित करावे. तसेच वाहनधारकांसह वाटसरूंना सुरळीत मार्गक्रमण करता यावे, याकरिता योग्य सुविधा करावी, अशी मागणी खैरी ग्रामवासीयांसह वाहनचालकांतून होत आहे.
