
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
पर्यावरण सवर्धन व विकास समिती महाराट्र राज्य यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्य वडकी येथे लग्नाचे औचित्य साधून नागपूर विभाग प्रमुख महेंद्र शिरोडे, यवतमाळ जिल्हा सचिव प्रकाश खुडसंगे व जिल्हा संघटक मनोहर बोभाटे पर्यावरण सवर्धन व विकास समिती जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ दोंदल यांच्या कल्पनेतून जागतिक पर्यावन दिनाचे औचित्य साधुन काल वडकी येथील नवं दाम्पत्य कोठेकर वाढोना बाजार व भोज परिवार यांच्या लग्नाचे औचित्य साधून सप्तपदिचा कार्यक्रम न करता सात रोपटे लावून आपल्या लग्नाच्या दिवशी नववधूना सात रोपटे लावून शुभेच्या देण्यात आल्या, व सर्व झाडाचे संगोपन करण्याचे आश्वासन वडकी येथील स्मॉल वंडर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज वडकी यांनी दिले असल्याने त्या ठिकाणी हा आगळा वेगळा उपक्रम वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दीन साजरा करण्यात आला त्याच वेळेस एक लग्न कार्य होते त्या लग्नातील वधु वरांनी आमच्या विनंतिस मान देवुन सप्तपदि न करता सात रोपट्यांचे वृक्षारोपण करून जागतिक पर्यावर दिन साजरा केला .असता त्या वेळेस नागपूर विभाग प्रमुख महेंद्र शिरोडे, यवतमाळ जिल्हा सचिव प्रकाशभाऊ खुडसंगे, यवतमाळ जिल्हा संघटक मनोहरभाऊ बोभाटे , चेतन दुर्गे , प्रविन झाडे, वडकी प्रत्रकार शंकर जोगी व नव दाम्पत्य, तसेच शाळेचे प्रिन्सिपॉल मंजुषा सागर,अहमद शेख,संतोष गेडाम ईत्यादी मान्यवर उपस्थित होते,
