
संस्कृती संवर्धन विद्यालयात शिक्षणदिन साजरा
राळेगाव : (तालुका वार्ताहर) दि. १ जानेवारी २०२४ : संस्कृती संवर्धन विद्यालय राळेगाव, जि यवतमाळ या शाळेत १ जानेवारी हा इंग्रजी नववर्ष दिन शिक्षणदिन म्हणून साजरा केला. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ ला पुणे येथील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करुन स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि महिलांच्या उन्नतीसाठी दारे उघडी केली. त्याचे स्मरण सर्वांना विशेषतः विद्यार्थ्यांना नित्य असावे, म्हणून संस्कृती संवर्धन विद्यालयाच्या मा. मुख्याध्यापिका सौ. मीनाक्षी येसेकर यांनी गेल्या २५ वर्षापासून १ जानेवारी हा इंग्रजी नववर्षाचा जल्लोष न करता समाजसुधारक फुले दाम्पत्याच्या प्रतिमेचे पूजन आणि त्यांच्या जीवनकार्याची व शैक्षणिक क्रांतीची विद्यार्थ्यांना माहिती देत शिक्षण दिन साजरा करीत आहे. याप्रसंगी सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख दिनकर उघडे सर यांनी फुले दाम्पत्य आणि त्यांचे कार्यावर प्रश्नमंजुषेचे आयोजन केले. आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक देवेंद्र मून, योगेश मिटकर, सीमा देशमुख,सलमा कुरेशी, ज्ञानेश्वरी आत्राम,भाग्यश्री काळे, विलास ठाकरे, अनंता परचाके, प्रकाश अंबादे आदींनी विशेष परिश्रम घेतले. नववर्षाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
