
केळापूर, आर्णी व राळेगाव विधानसभा क्षेत्रातील आदिवासी समाज बांधव व सरपंच उपसरपंच संघटनांनी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव व आर्णी केळापूर विधानसभा क्षेत्रातील काही आदिवासी समाज बंधावातर्फे दि.२६/१२/२०२३कार्यालयाचे आपले लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढून मागणी करण्यात आली होती.पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी श्रीमती याशनी नागराजन ह्या आदिवासी विरोधी भूमिका बजाविणाऱ्या अधिकारी आहेत कारण प्रकल्प कार्यालया मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती अथवा विचारणा करण्यासाठी पांढरकवडा प्रकल्प कार्यालयात गेले असता प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन ह्या लाभार्थ्यांना धाकदपट करतात, ग्रामपंचायत पातळीवरील सरपंच,उपसरपंच ग्रा.पं.सदस्य योजना विषयक माहिती जाणून घेण्यासाठी गेले असता या त्यांना विचारणा केली असता विचारणा करणाऱ्या व्यक्तींना पोलीस बळ वापरून कार्यालया बाहेर हाकलून लावतात,पोलिसात गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवतात आदिवासींच्या सार्वांगीण विकासाकरिता असलेल्या योजनांची अंमलबजावणी करीत नाहीत,याच कारणाने ऑगस्ट २०२३ मध्ये विध्यार्थी व पालक वर्गानी १० दिवस आमरण उपोषण केले होते,तसेच आदिवासी सेवक सन्मानित सेवकाने माहिती विचारली असता अधिनस्त कर्मचार्यांना सांगून शासकीय कामात अडथडा निर्माण केला अंतर्गत गुन्हे दाखल गेले आहेत,योजनांची माहिती दडपउन ठेवणे,योजनांची वेळेत अंमलबजावणी न करणे अधिकाराचा दूरउपयोग करीत आदिवासी लाभार्थ्याना धाकदपट करणे असा कारभार येथील प्रकल्प अधिकारी यांची हकालपट्टी करा व या ठिकाणी दुसरा प्रकल्प अधिकारी देण्यात यावे या प्रमुख मागणीला घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्च्याच्या माध्यमाने दोन आदिवासी मतदार संघातून मुख्य मागणी येथील प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन यांना हटविण्यात यावे हि विनंती. तसेच मोर्चा करून 8 दिवस होऊन सुधा कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे स्मरण. निवेदन मा.जिल्हाधिकारी यवतमाळ यांना देण्यात आले यावेळी निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते व सरपंच श्री वानिश नि. घोसले व इतर आदिवासी पदाधिकारी उपसथित होते.
