
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत पूर्ण वेळ ग्रामसेवक नसून बऱ्याच ठिकाणी प्रभारावर ग्रामसेवक कामे पहात असून ग्रामसेवक हे पद म्हणजे ग्रामपंचायत आणि गावकरी यांच्या मधला दुवा असून बऱ्याच ठिकाणी ग्रामसेवकांच्या माध्यमातून गावकऱ्यांची कामे मार्गी लागत असून पण प्रभारी ग्रामसेवक अशा कामाकडे दुर्लक्ष करतात .राळेगाव पंचायत समितीत 74 ग्रामपंचायत असून 57 ग्रामसेवक/ग्राम विकास अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहे.राळेगाव तालुक्यातील 6ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकाऱ्यांची तालुक्याच्या बाहेर बदली झाली असून त्याठिकाणी बाहेर तालुक्यातून कुठलाही ग्रामसेवक किंवा ग्राम विकास अधिकारी रूजू झाले नाही.सध्याच्या परिस्थितीत राळेगाव पंचायत समितीत 33 ग्रामसेवक/ग्राम विकास अधिकारी असून त्यांच्यावर 74 ग्रामपंचायतीचा भार असून यामुळे बऱ्याच ग्राम पंचायतीची विकास कामे थांबली असून या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ज्या ज्या ठिकाणी ग्रामसेवक नाही त्या त्या ठिकाणी ताबडतोब ग्रामसेवक नियुक्त करावे अशा आशयाचे निवेदन मा.गटविकास अधिकारी राळेगाव यांना अखिल भारतीय सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष सुधीर जवादे यांनी दिले असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
