शेतशिवार पेरणीसाठी सज्ज पेरणी यंत्राचा सुद्धा साज्यावाज्या झाला पण निसर्ग देतो आहे हुलकावणी


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ


मृग नक्षत्र जवळपास कोरडे जाण्याच्या परिस्थितीत आहे तसे बघता खरीप हंगामाची जवळपास सर्व तयारी शेतकऱ्यांनी पूर्ण केली असून बी बियाण्याचा साठा सुद्धा कास्तकारांनी शेतात नेऊन ठेवला असून निसर्गाचा अदभूत विचित्र लहरीपणा बघायला मिळत आहे अखा उन्हाळा तापणाऱ्या स्वरूपात असताना या ऋतूमध्ये विजेच्या कडकडाटासह प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला बघायला मिळाला पण सध्या जून महिन्याचे दोन आठवडे उलटून गेले पावसाचा मात्र थांग पत्ता नाही या तारखेला जरूर येणार असे सांगणाऱ्याच्या भविष्यवाणी सुद्धा निसर्गाराजाने खोट्या ठरवून निसर्गराजा सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवून दिले. रब्बी हंगामात अनेक नैसर्गिक अडथळे पार करीत शेतकऱ्यांनी येणाऱ्या खरिपाची तयारी केली असली तरी निसर्गराजांने जो पर्यंत “कमांड” दिली नाही तोपर्यंत शेतकरी राजा सतर्क होत नाही एवढे नक्कीच.
शेतीची कामे जवळपास पूर्ण झाली असून या आधी अवकाळी पाणी हे मुसळधार स्वरूपात पडल्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत करून ठेवली होती. त्यामुळे काही शेतामध्ये इचडा, केणा, रानमूग अशा प्रकारचे तन निघाली होती पण वखरटीच्या मदतीने ते तन शेतकऱ्यांनी नष्ट केले त्यामुळे अवकाळी पर्जन्यवृष्टीने हे एक प्रकारे बोनसच दिले म्हणायला पाहिजे व भविष्यातील तनाचा काही प्रमाणात बंदोबस्त झाला सध्या शेतीही आधुनिक पद्धतीने करताना बघायला मिळत असून त्यानुसार विविध पेरणी यंत्र बाजारपेठेत उपलब्ध झाले काही दिवसाचे काम काही तासावर आले ट्रॅक्टरने जरी पेरणी होत असली तरी जुने जाणकार शेतकरी आज सुद्धा बैलाच्या पेरणीवरच भरोसा ठेवतात. त्यानुसार पेरणीयंत्र आलीत लागणारे पाईप लोखंडी साहित्य व पेरणी यंत्रातील रबर स्वरूपातील वायसर दुरुस्ती करावी लागते कितीही व्यवस्थित ठेवले तरी शेत शिवारात असलेली उंदीर वायसरची नासधूस व खराब करतात त्यामुळे सोयाबीन पेरताना वायसर व्यवस्थित नसतील तर सोयाबीनची डाळ होऊन त्याचा उगवण शक्तीवर परिणाम होतो त्यामुळे ते दुरुस्ती करणे अनिवार्य बनते. त्यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असलेले विश्वकर्मा वेल्डिंग वर्कशॉप येथे रात्रंदिवस एक करून शेतकरी राजाचे पेरणी यंत्राचे दुरुस्तीचे काम चालू असून तेथील संचालक अरविंद सूर्यवंशी यांनी सांगितले की ग्राहक हेच आमचे दैवत असून विद्युत पुरवठा वेळोवेळी खंडित होत असला तरी शेतकऱ्याची पेरणी यंत्र दुरुस्ती करण्यास कोणताही अडथळा येणार नाही. प्लॅस्टिक पाईप, लोखंडाच्या वाढत्या किमती आणि वाढलेली मजुरी यामुळे थोडेफार अवजार महाग झाले आहे असे शेतकरी वर्गातूनच बोलल्या जात आहे. पाच ते सहा माणसे पेरायला लागत असताना वाढती मजुरी आणि मजुरांची कमतरता यामुळे ही आधुनिक यंत्र खूप शेतकऱ्यासाठी फायदे शीर ठरत असून ट्रॅक्टरने पेरणी जरी होत असेल तरी पाणी पाऊस मोठ्या प्रमाणात पडला तर चीबाड रानात ट्रॅक्टर चालत नसल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकरी बैलावर चालणारी यंत्रणा सज्ज ठेवत असताना दिसत आहेत.