
सहसंपादक :- रामभाऊ भोयर
पांदन रस्त्याचे अतिक्रमण ही ग्रामीण भगातील ज्वलंत समस्या आहे. शासनाचे होणारे दुर्लक्ष व पांदन रस्ता तयार करण्यास न मिळणारा निधी या मुळे अनेक शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. कृषी प्रधान अर्थ व्यवस्थेत पांदन रस्त्याचे आज सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. परंतु काही असंवेदनशील लोकांकडून पांदन रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले होते. यासाठी वाऱ्हा येथील ग्रामस्थांनी अतिक्रमणची बाब तालुका महसूल प्रशासन यांच्या लक्षात आणून दिली. परंतु दोन महिने होवून सुद्धा त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्या नंतर गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार केली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ३१ मे पर्यंत अतिक्रमण काढण्याचे आदेश तहसीलदार यांना दिले.पावसाळा तोंडावर आला असल्याने शेतकरी अगतिक झाले होते, दोन तीन लोकांमुळे १०० गरीब शेतकऱ्यांना त्रास सुरू झाला होता. शेवटी अतिक्रमण झालेला रस्ता लोकसहभागातून मोकळा झाला. यात गावातील सरपंच आणि सर्व जागरूक
लोकांचा सहभाग असल्यामुळे पावसाळ्या पूर्वी रस्ता मोकळा झाला.
