

सहसंपादक:- रामभाऊ भोयर
राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या टाकळी येथील शेतकरी विठ्ठल कुळसंगे वय वर्ष अंदाजे 70 हे आपल्या शेतात पेरणी व टोबनी करन्यासाठी शेतात मजूर घेऊन गेले असता शेतात मजूर टोबनी, पेरणी करत असताना शेतकरी विठ्ठल कुळसंगे हे इलेक्ट्रिक पोल जवळ कचरा वेचत होते. कचरा वेचत असताना त्यांना पोलच्या अर्थींग चा करंट लागला असता ते खाली पडले पडलेल्या अवस्थेत पाहुन शेतातील मजुरांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना विठ्ठल कुळसंगे यांना करंट लागल्याचे समजता प्राथमिक आरोग्य केंद्र वाढोना बाजार येथे प्रथम उपचारासाठी पाठविण्यात आले मात्र तेथील डाॅक्टरांनी ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे रेफर केले मात्र तोपर्यंत त्यांनी आपला जिव सोडला होता. विशेष म्हणजे म्रुतक शेतकरी यांनी माझ्या शेतात खांबाला करंट येत आहे असे चार दिवस अगोदर तोंडी स्वरूपात एम एस ई बीला कळविले होते असे घटनास्थळी बोलल्या जात होते. याच लाईनमन बद्दल सावनेर येथील शेतकरी यांनी राळेगाव महावितरण कडे तक्रार सुद्धा केली होती मात्र तेथील अधिकारी वर्गाने त्या तक्रारीला खो दिंला. असा कामचुकार लाईनमन बदलून देन्याची मागणी टाकळी येथील गावकरी यांच्याकडून होतांना दिसत आहे. पुढिल तपास राळेगाव पोलीस करित आहे.
