शेतकरी महीलांची शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यास सहलीचे आयोजन

शेतकरी महिलांना शासकीय कामकाजाची व शासकीय योजनांची माहिती व्हावी करिता दी. 27 जूनला तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
तहसील कार्यालयातील निराधार पेंशन योजना विभागाचे नायब तहसीलदार एन डी बेंडे यांनी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना विषयी माहिती दिली, तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायाचा असल्यास कोणकोणती कागदपत्रे लागतात या बद्दल मार्गदर्शन केले तसेच सहभागी महिला मधून भुलगड येथील शेतकरी महीला सुनिता भूरकुटे व राळेगाव येथिल माधुरी खडसे यांचा शाल व श्रीफळ देऊन कृषी विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुजित चल्लावर यांनी शेतमाल विक्री पद्धती समजावून सांगितली, वर्षानुवर्षे शेतात कष्ट करून उत्पन्न घरी आणायचे व विकायला घरची माणसचं यायची त्यामुळे महिलांना संधीच मिळाली नव्हती आज सर्व शेतकरी महीलानी पहिल्यांदाच बाजार समितीचे कार्यालय बघितल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले,
प्रेरणा ग्राम विकास संस्था मर्फत महीला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत सहलीचे आयोजन करण्यात आले होते, रावेरी, झाडगाव, झरगड, वरूड, सोयटी, तेजनी, व भुलगड येथील नेतृत्वशिल शेतकरी महिला सहभागी झाल्या होत्या
.