शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षकांच्या समस्या निवारणासाठी बोलावली यवतमाळ येथे सभा

सहसंपादक :- रामभाऊ भोयर

यवतमाळ जिल्ह्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे नियमित वेतनासह अनेक अनेक प्रश्न भेडसावत असून अनेक शिक्षक बांधवाचे जिपीएफ, पेन्शन केसेस असे अनेक प्रश्न निर्माण होऊन असून या प्रकरणी निपटारा करण्यासाठी सोबतच वेळेत येणारे प्रश्न यांचा निपटारा करण्यासाठी मंगळवार दिनांक11/7/2023 ला दुपारी एक वाजता जिल्हा परिषद सभागृह यवतमाळ येथे सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेला माजी शिक्षक आमदार व्ही.यू.डायगव्हाणे सर, प्रांतिक अध्यक्ष श्रावणजी बरडे सर, प्रांतिक उपाध्यक्ष अरविंद देशमुख सर, विभागीय कार्यवाह मुरलीधर धनरे सर, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अशफाक खान सर, जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे सर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून सीईओ, शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग, शिक्षणाधिकारी माध्यमिक,सोबतच संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार ज्या बंधू भगिंनीच्या तक्रारी असतील त्यांनी सकाळी अकरा वाजता रेस्टहाऊसला आपल्या लेखी स्वरूपात तक्रारी द्याव्यात त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील सर्व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, यांनी सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.