
सिडको, ता. 10 महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय पवन नगर येथे पालक शिक्षक संघाची स्थापना व कार्यकारी निवड करण्यासाठी पालक शिक्षक मेळावा झाला. मुख्याध्यापक श्री उमेश देवरे सर अध्यक्षस्थानी होते. सर्वानुमते उपाध्यक्ष म्हणून श्री श्रीकांत तुकाराम उगले, सौ निकम संगीता विजय,सचिव सौ जोशना सोनवणे सहसचिव सौ ज्योत्स्ना मोरे सदस्य या पालकांची निवड करण्यात आली. याप्रसंगी श्री प्रदीप हिरे पर्यवेक्षक उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे व विद्येचे देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्री संजय पवार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक श्री उमेश देवरे सर यांनी कार्यकारणी निवड केली व मागील शैक्षणिक वर्षाचा आढावा मांडला त्यात विद्यार्थी प्रवेश, भौतिक सुविधा शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा, एसएससी परीक्षा इत्यादीची माहिती व पालकांना दिली. तसेच पालक शिक्षक संघाचे कर्तव्य, शालेय उपक्रम, विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्यासाठी पालकांनी लक्ष देण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होत्या.
