
उमरखेड तालुका प्रतिनिधी,:-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड
हेल्प फाऊंडेशन शाखा यवतमाळ येथील भाविक भाऊ भगत यांनी गावोगावी उभारलेल्या शाखा यांचे पदाधिकारी यांच्यासह बिटरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बनसोड मॅडम यांना पुष्पगुछ देत स्वागत केले. नंतर नवनियुक्ती कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सुजाता बनसोड मॅडम यांना सर्वांचा परिचय दिला या प्रसंगी भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेड चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हाध्यक्ष अनुपभाऊ शेखवत यांनी हेल्प फाऊंडेशनच्या कार्याबद्दल माहिती दिली. गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी भाविक भाऊ भगत हे चोवीस तास सेवेसाठी तत्पर असतात त्यामुळे आपले सहकार्य लाभावे असे भाऊ भगत यांनी सागितले यावेळी. बिटरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुजाता बनसोड मॅडम यानी आश्वासन दिले की माझे चांगल्या कार्यामध्ये नेहमी माझे सहकार्य राहील. या प्रसंगी उपस्थित मान्यवर भाविक भाऊ भगत, हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक, व जिल्हाध्यक्ष अनुपभाऊ शेखावत, जिल्हाउपाध्यक्ष विष्णू भाऊ चौधरी,तालुका उपध्यक्ष राजकुमार शिरगरे,विजय भाऊ, विनोद भाऊ वाडवे सावळेश्वर गावाचे ग्रामपंचायत सदस्य, परमेश्वर रावते, हर्षल भाऊ काळबांडे, सतिश भाऊ गडदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते।.
