आर एम इंटरनॅशनल स्कूल राळेगाव येथील खाजगी संस्थेचा मनमानी कारभार : विद्यार्थ्यांच्या शाळा सोडण्याच्या दाखल्यासाठी पालकांना दिला जातो नाहक त्रास
[पालकाकडून संस्थेवर कारवाईची मागणी]

सहसंपादक: रामभाऊ भोयर

अपत्य प्राप्त झाल्यावर आकाशाला गवसणी घालणारा आनंद मात्र अपत्याच्या शाळा प्रवेशाच्या वेळी विरून जातो पूर्वीच्या काळी माणसाला चिंता होती घर लग्न यासाठी खर्चाची पण अलीकडच्या काळात पालकाला सर्वाधिक चिंता असते ती अपत्याच्या शाळा प्रवेश डोनेशन व शाळेच्या अवाढव्य फीची खाजगी शिक्षण संस्थेचे शुल्क इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की सामान्य पालकाच्या आवाक्या बाहेर गेलेले आहे इतके सर्व करून पालक आपली जबाबदारी समजून त्याची पूर्तता करतो परंतु जेव्हा त्या संस्थेतून दाखला काढायची वेळ येते तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने आज या उद्या या असा चाल ढकल पध्दत सुरू आहे. कधी काही अवास्तव कागदपत्राची मागणी करून दिवस घालून नेतात याची प्रचिती राळेगाव येथील एका वर्ग सहावी शिकणाऱ्या मुलीच्या दाखला काढावयास गेलेल्या एका पालकाला आला आपल्या शाळेतील पटसंख्या कमी होणार या भीतीने काही प्रकार करतात तशा प्रकारचा त्रास नाहक त्रास दिला जातो पण कोणीही समोर यायला तयार राहत नाही असा प्रकार राळेगाव येथील आर् एम इंटरनॅशनल स्कूल राळेगाव मध्ये घडला आहे संबंधित पालकांनी त्याच्या मुलीला 2018 ला फर्स्ट स्टॅंडर्ड ला दाखल केले त्यावेळी जन्माच्या दाखल्याची प्रत देण्यात आली पण ते जेव्हा पालक दाखला काढावयास गेले असता विनंती अर्ज त्या कार्यालयाला दिला परंतु दाखला देऊन सुद्धा आज या उद्या या असे म्हणत त्यांनी परत पाठविले त्यानंतर जेव्हा दाखला घ्यायला गेले असता तुम्हाला आम्ही शाळा सोडल्याचा दाखला तोपर्यंत देऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही जन्माच्या दाखल्याची ओरिजनल प्रत या कार्यालयात सादर करीत नाही याविषयी पालकांनी संबंधितांना सांगितले की जन्मतारखेच्या दाखल्याची प्रत आपल्याजवळ आहे त्यावर मी सत्य प्रत असे लिहून स्वाक्षरी सुद्धा करून दिली आणि त्यानुसार त्यांनी ते केले सुद्धा परंतु त्या संस्थेने ते मान्य केले नाही जन्माच्या दाखल्याची प्रत असताना सुद्धा ओरिजनल परत आणावी त्याशिवाय तुम्हाला आम्ही शाळा सोडल्याचा दाखला देणार नाही ही भूमिका त्यांनी घेतली आहे ही बाब शिक्षण विभाग यांना दिली असता कोणतीही कारवाई केली नाही त्याच प्रमाणे आर्थिक बाबीची पूर्तता करायची असेल तर संस्थेच्या माध्यमातून फोन करून त्रास दिला जातो पण अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आज पर्यंत या संस्थेच्या माध्यमातून कोणताही संपर्क साधला नाही यावरुन यांची मानसिकता दिसून येते आज शाळा 30 जून पासून सुरू झाली परंतु संबंधित पालकाच्या पाल्याला शिक्षणापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवल्या ने तिचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे याला सर्वस्वी जबाबदार ही खाजगी शिक्षण संस्था तेथील कर्मचारी आहे त्यामुळे माझ्या मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या कलम 5 नुसार दाखला न देणाऱ्या संबंधितावर गुन्हा दाखल करून कार्यवाही करावी कार्यवाही न झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षण विभाग तथा शासन यांची राहील संबंधितावर गुन्हा न दाखल झाल्यास कार्यवाही न झाल्यास संबंधित पालकांनी आमरण उपोषण करण्याची भूमिका घेतलेली आहे खाजगी त्याचप्रमाणे खाजगी शिक्षण संस्थेने खाजगी शिक्षण संस्थेने आपल्या ठाण मानून ठेवले आहे शासनाचे धोरण आहे की कोणताही व्यवहार हा पारदर्शक असावा हा यासाठी धनादेश आरटीजीएस त्याचप्रमाणे इतर माध्यमातून त्यांनी व्यवहार करावयास सांगितलेले आहे परंतु अद्यापही काही संस्थेमध्ये अजूनही व्यवहार हे नगदी स्वरूपात घेतल्या जात आहे 25% ऍडमिशन संदर्भात सुद्धा प्रवेशाच्या वेळी शैक्षणिक शुल्क म्हणून फी वसूल केल्या जात आहे असे पालक वर्गातून बोलल्या जात आहे. 2020 ला स्कूल बॅग धोरण हे निश्चित झालेले आहे परंतु बॅक चे वजन मात्र अजून पर्यंत कमी झालेले नाही याकडे शासनाचे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे जड बॅग मुळे वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना वेगवेगळ्या प्रकारचे आजार विद्यार्थ्यांना होत आहे 2018 ला मद्रास हायकोर्टाने विद्यार्थी अतिशय जड वजन वाहून नेणारे कंटेनर नाहीत अशा बाबतचा निर्वाळा दिल्या बाबतचे वृत्त काही दिवसा अगोदरच प्रकाशित झाले होते पण अजूनही संस्थाचालक शासन प्रशासन मात्र याकडे सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे त्यामुळे या सर्व बाबीकडे जर गांभीर्याने जर लक्ष दिला गेले नाही तर नाईलाजाने पालकाला भविष्यात मोठे आंदोलन करावे लागणार या संदर्भात आवाज उठवावा लागेल अशी खमंग चर्चा पालक वर्गामध्ये दिसून येत आहे.