
लोकहित महाराष्ट्र उमरखेड तालुका प्रतिनिधी: संदीप बी. जाधव
आज दिनांक १७ जुलै पासून उमरखेड तालुक्यातील मौजे चुरमुरा येथे मागच्या अनेक वर्षांपासून बंद असलेली शालेय विध्यार्थीनी साठी असलेल्या मानव विकास मिशन बस सेवा सुरु करण्यात आली ह्या बस सेवे मुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात दररोज शाळेसाठी ये जा करणाऱ्या विद्यार्थिनी साठी लाभ होणार आहे ह्या बस सुरु करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री नितीनजी भूतडा यांच्या मार्गदर्शनात भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अतुल भाऊ खंदारे उपाध्यक्ष पिंटू पाटील पवार अनिकेत पवार मनोज वानखेडे आकाश जाधव विशाल चव्हाण यांनी प्रयत्न केले व बस सेवा उद्घाटन करण्यात आले यावेळी समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.
