
माहागाव प्रतिनिधी:- संजय जाधव
उमरखेड तालुक्यातील टाकळी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ईसापुर तांडा येथील अशोक गोकुळ जाधव (वय 42) या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. मंगळवार, 23 मे रोजी नऊवाजेच्य सुमारास त्यानी विष प्राशन केले ही घटना उघडकीस आली.
अशोक गोकुळ जाधव ईसापुर येथे शेती करीत होते. गुरुवार, 23 मे रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास त्यांनी त्यांच्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले. काही वेळातच त्यांच्या कुटुंबियांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने अशोक यांना प्राथमिक आरोग्य केंद्र फुलसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचार केले पण त्या उपचाराला अपयश मिळाल्यामुळे दिनांक 29 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला पुढील तपास बिटरगाव पोलीस स्टेशन करीत आहे असून मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे . अशोक जाधव यांच्या मागे वृद्ध आई-वडील पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे.
