
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
यवतमाळ सावनेर ता. राळेगाव येथे भव्य महा राजस्व अभियान सन २०२१/२०२२ अंतर्गत पारधी (बेडा) येथ जातीचे दाखले व इतर कागदपत्र वाटप
मौजा सावनेर पारधी (बेडा) येथे महाराजस्व अभियान अंतर्गत माननीय श्री शैलेशजी काळे उपविभागीय अधिकारी राळेगाव व माननीय डॉ. रवींद्रकुमार कानडजे तहसीलदार राळेगाव यांचे मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शिबिराचे आयोजन सावनेर ता राळेगाव येथे करण्यात आले व पारधी समाजाच्या लोकांना एकुण ८१ जातीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच मिलींद मडावी तलाठी सावनेर यांचेकडून बँकेच्या कर्जा करिता लागणारे सातबारा व आठ अ चे निःशुल्क वाटप करण्यात आले तसेच शिबिरामध्ये मुलांच्या शिक्षणाकरीता लागणारे उत्पन्नाचे दाखले, राशन कार्ड व इतर कागदपत्रे जाग्यावर देण्यात आले सदर शिबिर यशस्वी करण्याकरीता विषेश परिक्षम श्री मिलिंद मडावी तलाठी, श्री अरविंद गोटे मंडळ अधिकारी वाढोणा बा. यांनी केले व विनोद अक्कलवार तलाठी, संध्या देशकरी तलाठी प्रियंका ब्राह्मणकर तलाठी यांनी मदत केली. मंडळातील सर्व तलाठी उपस्थित होते व सर्व गावकरी यांनी शिबिरास भेट दिली. तलाठी मिलिंद मडावी यांनी विशेष परिश्रम घेवुन प्रमाणात पत्र तयार करुन घेतल्या बाबत सर्व पारधी समाज बांधवांनी त्याचे आभार मानले.
