
वरोरा तालुक्यातील खांबाडा परिसरातील कोसरसार गावाच्या रस्त्यावर अवैधरित्या देशी दारू ची तस्करी करणारे दोन आरोपी व सुझुकी कंपनीची मालवाहू गाडी क्र. MH 34 BG 6772 या गाडीतून अवैध देशी दारूची तस्करीची गुप्त माहिती च्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी , परिविक्षाधीन पोलीस निरीक्षक योगेश रांजनकर यांनी 17 जुलै रोजी रात्री पावणे अकराच्या दरम्यान वाहन पकडले. ज्यात 40 पेट्या एकूण 400 नग ऑरेंज देशी दारू 90 मिली. सह चार चाकी वाहन पोलिसांनी जप्त केले.यात एकूण आरोपी
1)अमोल चौधरी ,बोथली
2) पवन भोयर, मानोरा(शी)
3) हर्षल खंगार याच्यावर कलम 83 व। 65 (A) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही मा श्री.रवींद्रसिंग परदेशी सर पोलीस अधीक्षक चंद्रपूर ,
मा. रीना जनबंधू मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर , मा.श्री आयुष नोपाणी सर ASP वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली परि पो उप अधीक्षक योगेश रांजणकर API चावरे, PSI बेलसरे ,PSI किशोर मित्तरवार PSI मुसळे , NPC किशोर बोडे, PC सुरज मेश्राम PC दिनेश मेश्राम PC फुलचंद लोधी व इतर पोलीस स्टाफ यांनी केली.
