
तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
नुकत्याच दिल्ली येथे केंद्र सरकारच्या शिक्षण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑल इंडिया सिविल सर्विस टूर्नामेंट 2022- 23 जलतरण स्पर्धेमध्ये भंडारा येथील अन्नपुरवठा निरीक्षक आनंद पडोळे यांनी उत्तम कामगिरी बजावत जलतरण स्पर्धेत कास्यस्पदकाने सन्मानित करण्यात आले .या त्यांच्या विजयाने भंडारा तहसील येथील अन्नपुरवठा विभागाच्या नावासोबतच जिल्ह्याचे नाव त्यांनी रोशन केले. त्यांच्य या मिळालेल्या कास्य पथकाबद्दल भंडारा येथील तहसीलदार रवींद्र हिंगे ,भंडारा येथील जिल्हाधिकारी योगेश कुंभोजकर, जिल्हा पुरवठा अधिकारी नरेंद्र वंजारी ,संपूर्ण रास्त भाव दुकानदार यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.
