सततच्या चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागेशवाडी येथील घर पडले,शासकीय मदत मिळावी अशी मागणी

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड


निंगनूर.ग्रामपंचायत अंतर्गत येणारी नागेशवाडी येथील चव्हाण यांचे घर सततच्या मुसळधार पावसामुळे पडून उध्वस्त झाले आहे .तरी तहसीलदार साहेबांनी त्यांचे पडलेल्या घराचे पंचनामा साठी तलाठी साहेबांना व तसेच ग्रामपंचायत निंगनूर येथील ग्रामसेवक याना तात्काळ आदेश देत पंचनामासाठी पाठवून त्या निराधार कमलाबाई जयवंत चव्हाण याना शासना मार्फत काही मदत मिळावी अशी अपेक्षा चव्हाण कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.