अत्याचार पीडित आदिवासी महिलेचा विष घेत आत्महत्येचा प्रयत्न , न्याय न मिळाल्याने उचलले पाऊल

वरोरा पोलिस स्टेशन परिसरातील घटना : या प्रकरणाने शहरात उडाली खळबळ


वरोरा (वा.). स्वतःवर झालेल्या अत्याचाराविरोधात पीडित आदिवासी महिलेने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे आरोपीवर कारवाई करून पैसे घेऊन आरोपीचा करणाऱ्या बचाव एपीआयवर कारवाई करावी, अन्यथा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात येवून विष प्राशन करून आत्महत्याकरण्याचा इशारा पत्रपरिषदेतून दिला होता. मात्र पोलिस प्रशासन योग्य ती पावले न उचल्याने पीडित आदिवासी
महिलेने वरोरा पोलिस ठाण्याच्या आवारात आज 7 ऑगस्टला दुपारी आरोपींना न्यायालयीन कोठडी | निराशेतून उचलले पाऊल : एसडीपीओ नोपाणी 3.45 वाजताच्या सुमारास विषप्राशनकरून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपी रिझवान शेख वय 32, मोहसीन शेख 24,
दानिश शेख 27 याला खंबाडा येथून अॅट्रासिटी कायद्यान्वये अटक केली. आरोपींपैकी एक मोहम्मद शेख 61 याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे अटक करण्यात आली नाही.


आरोपींना वरोरा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
पीडित महिला चंद्रपूर येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात जाणार होती. मात्र अपर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू वरोऱ्यात हजर असल्याने त्यांना वरोरा पोलिस ठाण्यात बोलविले. यावेळी रीना जनबंधू, एसडीपीओ आयुष नोपाणी, प्रभारी ठाणेदार योगेश रांझणकर, वरोराचे ठाणेदार आणि दोन महिला पोलिस अधिकारी उपस्थित होते. महिलेची समजूत काढूल व कायदेशीर कारवाईची बाजू समजावून सांगण्याचे प्रयत्न सुरू होते. तेवढ्यात निराशेतून महिलेने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी माहिती एसडीपीओ आयुष नोपाणी यांनी दिली. याप्रकरणी कारवाई न केल्याने एपीआय नीलेश चवरे यांची बदली केली. वरोरा पोलिस अधिक तपास करत आहेत.रुग्णालयात दरम्यान घटनेनंतर महिलेला चंद्रपूर जिल्हा शासकीय उपचारार्थ दाखल करण्यात आले. सदर महिलेची प्रकृती गंभीर असल्याने पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. एका पुरुषाकडून आपल्यावर अत्याचार झाला असून काही लोकांना आपल्याला मारहाण
‘देखील केली आहे, अशी तक्रार पीडित आदिवासी महिलेने पोलिस विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार केली. या संदर्भात चंद्रपुरात पत्रकार परिषदही घेण्यात आली. त्यानंतर आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, आरोपीला अटक न करता थेट
केली होती. मात्र, तक्रार करूनही एसपी आणि एपीआय आरोपीशी काही आर्थिक व्यवहार करून आरोपीला
वाचविण्याचा प्रयत्न करत होते. उलट त्या महिलेवरच गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केल्याने महिलेने संतप्त होऊन न्यायालयात हजर करण्यात आले.

याप्रकरणी आरोपीला अटक करूनएपीआयवर देखील कारवाई करावी, अशी मागणी सदर पीडित महिलेकडून करण्यात आली. मात्र, पोलिस प्रशासनाने योग्य ती पावले न उचलल्याने पीडित आदिवासी महिलेने एका बाटलीत विषमिश्रित पाणी घेऊन वरोरा पोलिस ठाणे गाठले आणि विष प्राशन केले. त्यामुळे महिला खाली पडली. पोलिसांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.