टाकळी ईसापुर येथील सरपंच सौ . उज्वला प्रभाकर हाके सचीव पी. के. कदम स्वातंत्र्यदिनी जिल्हाधीकारी कार्यालय यवतमाळ येथे सन्मानित

टाकळी ईसापुर ग्रामपंचायतला जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक

महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव


उमरखेड तालुक्यातील टाकळीईसापूर ग्रामपंचायतला
सन २०२३साठी अमृतमहोत्सवानिमित्त मिळणाऱ्या राज्य आवास योजना पुरस्कारात उमरखेड तालुक्यातील टाकळी ई ग्रामपंचायतची निवड करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य आवास योजना ग्रामीण अंतर्गत अंतर्गत जिल्हयातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तीन तालुके, तीन क्लस्टर, व तीन ग्रामपंचायती यांच्या निवडीत टाकळी ईसापुर ग्रामपंचायतीची निवड झाल्याने १५ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात यवतमाळ गौरविण्यात येणार आहे.

१५ऑगस्ट २०२३च्या अमृतमहोत्सव निमित्ताने राज्य आवास योजना महाआवास अभियान टप्पा तीनअंतर्गत गुणांकानुसार जिल्ह्यात उमरखेड तालुक्यातील टाकळी ई ग्रामपंचायतने उत्कृष्ट कार्य करीत जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार प्राप्त केल्याने सदर कार्याची दखल घेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यवतमाळ यांनी स्वातंत्र्यदिनी सरपंच, सचिव व त्यांच्या टीमला उपस्थीत राहण्याचे पत्र ग्रामपंचायतला प्राप्त झाले होते पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवुन हा पुरस्कार बहाल करण्यात आला असुन टाकळी ई ग्रामपंचायतला मिळणाऱ्या पुरस्काराने जिल्ह्यातील ऊमरखेड तालुक्याच्या मानात अधिक भर घातली आहे. टाकळी ई ग्रामपंचायत चे सरपंच सौ .उज्वलाताई प्रभाकर हाके ,उपसरपंच दिलीप जाधव, ग्रामपंचायत सदस्य संदेश मोरे, उमेश जाधव, विठ्ठल गव्हाळे सौ रोहिणी जाधव,
सौ योगीता अतुल देवकते, सौ वंदना गणेश उतळे, सौ सुषमा बाळू चव्हाण सर्व सदस्याचे कौतुक होत आहे