
प्रतिनिधी: नितेश ताजणे वणी
शहरातील दामले फैल(प्रभाग क्र.6) येथील नगरपरिषदेचा हेतुपुरस्पर दुर्लक्षाने शौचालय अनेक वर्षभरापासून बंद अवस्थेत (जीर्ण अवस्थेत) आहे याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने येथील स्थानिक महिलांची कुचंबणा होत असताना दिसून येत आहे. अश्या या स्थितीने स्थानिक प्रशासनाबाबत महिलांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हगणदारी मुक्त संकल्पना वाऱ्यावर असल्याचेही चित्र दामले फैलात दिसून येत आहे. शौचालयाच्या समस्यांनी त्रस्त असून (प्रभाग क्र .6) मधील शौचालयाच्या रस्त्यावर प्रचंड घाणीचे साम्राज्य सरले आहे येथून चालणे देखील अशक्य असून रस्त्यावरच शौचालयाच्या पायऱ्यांवर वराह मृत्यूमुखी पडल्याने दुर्गंधी येत असल्यामुळे येथून जाणे देखील मुश्कील झाले आहे. यामुळे दामले फैल परिसरातील महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. याबाबत प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे. ‘स्वच्छ आणि हगणदारीमुक्त गावात आपले सहर्ष स्वागत असते मग अश्या परिस्थितीत शहरातील शौचालयाची अवस्था असेल तर त्या भागात माजी नगरसेवक कोणता पुरस्कार द्यावा हे आता येणाऱ्या स्थानिक निवडणूकीत देणार याचीही विशेष चर्चा आहे. मात्र येथील महिला शौचालयाच्या समस्यांनी त्रस्त आहेत.हे माजी नगरसेवक यांना दिसत नसेल का? जर ते दुर्लक्ष करीत असेलच मग काय नगरपरिषद कोमात आहे का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत पण येणाऱ्या निवडणुकीत कोणता नगरसेवक दामले फैल परिसरात “वोट दो ” म्हणणार याकडे लक्ष महिलांचे लागले असून त्याची वाटच…. असे म्हणायला देखील हरकत नाही.येथील परिसरातील महिलांची प्रचंड कुचंबणा सार्वजनिक शौचालये असून त्यांची दुर्दशा झालेली आहे. काटेरी झुडपात वेढले गेले असून तेथे जाणेच सध्या अशक्य असल्याचे दिसून येत असून महिलांच्या तक्रारी आहेत.शौचालयात जाणे तर सोडा मात्र शौचालयाजवळ जाणे देखील रस्त्यावरील प्रचंड घाणीच्या साम्राज्यामुळे जिकिरीचे आहे. या रस्त्यावरुन या शौचालयाकडे जाण्याचा रस्ता असून सध्या या रस्त्यावरुन जाणे अशक्य आहे.या रस्त्यावर दगड फरशी असून गटारी तुडूंब भरल्यामुळे गटारीतील बेसुमार पाणी फरशीवरुन वाहत असते. आजुबाजूला काटेरी झुडपे यामुळे प्रचंड घाणीचे साम्राज्य असून चालणे धोक्याचे झाले आहे. सतत पाणी वाहत असल्यामुळे दगडी फरशी निसरडी झाल्याने पडून गंभीर दुखापत होण्याचा धोका आहे तर या शौचालयाच्या पायऱ्यांवर वराह मरुन पडल्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरुन येथे उभे राहणे देखील मुश्कील असल्याच्या महिलांच्या तक्रारी होत्या. यामुळे येथील महिलांची प्रचंड कुचंबणा होत असून याची त्वरित दखल घ्यावी, अशी तेथील महिलांची मागणीही आहे.(प्रभाग क्र.6) परिसरातील रस्त्यावर उघड्यावर बसत असल्याचे विदारक चित्र दिसून येत असून महिला शौचालयाच्या समस्यांन ग्रस्त असून याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी येथील महिलांची मागणी आहे.
“मागील काळात मी पदावर असताना नगरपरिषदेचा आरोग्यविभागाला कागदोपत्री नवीन शौचालयाकरीता पाठपुरावा केलेला आहे. मग लगेच संपूर्ण विश्वातच महामारी (कोरोना सारखा) संसर्ग रोग पसरला व त्यावेळी प्रशासन प्रणाली अवघे 2 वर्ष सतत बचाव कार्य करत होता व त्यानंतर माझा नगरसेकपदाचा कार्यकाळ देखील संपला त्यानंतर नगरपरिषदेत “प्रशासक” बसल्याने शौचालय बांधकामाची मागणी ही तशीच थकीत राहील पण हापाठपुरावा माझा सतत सुरू राहणार आहे – प्रशांत उर्फ छोटू निमकर(माजी नगरसेवक, वणी).
