आयुर्वेद महाविद्यालयात रॅगिंगप्रतिबंध व व्यसनमुक्ती विषयावर व्याख्यानमाला संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर

यवतमाळ येथील डा.मा. म आयुर्वेद महाविद्यालय येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विज्ञापीठाचे विद्यार्थी कल्याण विभागामार्फत बहिःशाल शिक्षण मंडळ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वागीन व्यक्तीमत्व विकासाला चालना देण्यासाठी व विद्यार्थी हिताकरीता – रॅगिंग प्रतिबंध व व्यसनमुक्ती या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील सर्व पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, आंतरवासीय विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांना समुपदेशन करण्यात आले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुणे परिचय वैधा सौ. प्रीती माकडे यांनी करून दिला या कार्यक्रमाकरीता प्रमुख व्याख्याता म्हणून अडव्होकेट सौ. रोशनी कामडी यांनी रॅगिंग प्रतीबंध उपाययोजना व कायदेशीर बाबी यांचे महत्व विशद केले तसेच व्यसनमुक्ती बाबत समुपदेशन करून नशाजन्य पदार्थ तंबाखु, सिगारेट दारू आदी चे व्यसन करणार नाही याबाबत संकल्प घेण्यात आला

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव मुंदाने यांनी रॅगिंग प्रतिबंध तसेच व्यसनमुक्ती करीता लोकांमधे जनजागृती करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन आंतरवासीय प्रशिक्षणार्थी वैद्या. उत्कर्षा पवार यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आयोजनाकरीता महाविद्यालयीन विद्यार्थी कल्याण योजनेचे समन्वयक वैद्या माकडे तसेच सहकारी टिम यांनी प्रयत्न केले.