वडकी खैरी ग्राहक पंचायत शाखा स्थापन,
डॉ. फुटाणे अध्यक्ष,नंदुरकर सचिव

सहसंपादक : रामभाऊ भोयर

वडकी खैरी ग्राहक पंचायतची शाखा वडकी येथे स्थापन करण्यात आली. डॉ. अशोक फुटाणे अध्यक्ष, एड. पूनम पुणेवार उपाध्यक्ष, डॉ. कचरूलाल झामड उपाध्यक्ष, हरिभाऊ नंदुरकर सचिव, त्र्यंबक महाजन कोषाध्यक्ष, प्रदीप राऊत सहसचिव, दिलीप बांगरे प्रसिद्ध प्रमुख, प्रकाश चिन्हाने संघटक, चंदा चौधरी महिला प्रमुख, इतर सदस्य पुढील प्रमाणे – प्रशांत पिपराडे, नरेंद्र झिले, प्रशांत येन्नरवार, दिपक नालमदार, कृष्णकुमार मोहता, प्रमोद डाहुले, किशोर ढोमणे,पुंडलिक भोयर.
ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष डॉ. के.एस. वर्मा व सचिव प्रा. मोहन देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात कार्यकारणीची स्थापना करण्यात आली. यावेळेस ग्राहक पंचायतीच्या कार्यप्रणालीत माहिती नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.