
प्रतिनिधी : शेख रमजान बिटरगांव ( बु )
शहरातील कविता नारमवाड या विवाहित महिलेचा तिच्याच पतीने 21 जुलै च्या रात्री धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली होती व हत्ते नंतर तिचा पती शिवाजी नारमवाड हा घटनास्थळावरून पसार झाला होता. बिटरगाव पोलीस हा त्याचा जागोजागी शोध घेत होते शिवाजीला पकडण्याचे आव्हान पोलिसा समोर उभे टाकले आज तब्बल दीड महिन्यानंतर तो पोलीसांच्या हाती लागला. कविताचा हात्याने संपूर्ण ढाणकी शहर हादरले होते. कविता ही नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून आपल्या माहेरी ढाणकी येथे दहा वर्षाच्या मुलाला घेऊन राहत होती. घटनेच्या दिवशी शिवाजी हा तिला भेटायला ढाणकी इथे आला , रात्री जेवण केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद होऊन वादाचे रूपांतर झटापटीत झाले यातच राग अनावर होऊन शिवाजी यांने कविताच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. रक्ताने माखलेली कविता मदतीसाठी घराबाहेर धावली नातेवाईकानी कविताला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले मात्र अति रक्तस्त्राव झाल्याने रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. यात शिवाजी हा घटना स्थळवरून पसार होण्यात यशस्वी झाला होता. कवीता हिच्या बहिणीच्या तक्रारी वरून शिवाजी वर बिटरगाव पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला शिवाजीला पकडणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते. त्यासाठी पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर येऊन परिसर पिंजून काढला शिवाजी मोबाईल वापरत नसल्याने त्याची लोकेशन पोलिसांना मिळत नव्हती. त्याचे राहते गाव चिंचाळा तालुका भोकर येथे सुद्धा पोलिसांनी तपास केला व खबरे पेरले अखेर आज तो त्याच्या राहत्या गावी चिंचाळा येथे शेतात आला अशी माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली मिळालेल्या माहिती वरून दिनांक 2 ऑगस्ट रोजी बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार सुजाता बन्सोड यांनी आपले सहकारी पी एस आय शिवाजी टिपूर्णे मोहन चाटे गजानन खरात निलेश भालेराव दत्ता कुसराम दत्ता कवडेकर यांना घेऊन चिंचाळा गाठून कविताच मारेकरी शिवाजी याला पकडले अटक करून पुढील पोलीस स्टेशन बिटरगांव ( बु ) येथे आणण्यात आले पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बन्सोड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पाडवी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुजाता बन्सोड करत आहे.
मुलगा नरेंद्र ढाणकी येथील जिल्हापरिषद शाळेत वर्ग 4 मध्ये शिक्षण घेत होता, वडील शिवाजी याने आई कविताचा खून केल्याने आईच्या मायेला पोरका झालेला नरेंद्र आज वडील जेल मध्ये गेल्याने निराधार झाला.
