रेणुका विद्यालय, दहेगाव येथे शिक्षक दिन साजरा

राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या दहेगाव येथील गोविंद ग्रामीण शिक्षण संस्था जळका द्वारा संचालित श्रीमती रेणुकाबाई देशमुख माध्यमिक विद्यालय, दहेगाव येथील शाळेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती मंगळवार दि. 5 सप्टेंबर रोजी मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली. त्यानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर.जी. भोयर, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक श्री. जी. आर. इंगोले होते . शाळेतील विद्यार्थी राम दातारकर ,पायल कुबडे, सानवी पाऊनकर, भावना राऊत, योगिनी खोके, विशाल लोडे, करीना चव्हाण, ध्रुप राजूरकर, वैष्णवी बोधे ,वैष्णवी जोगी, अस्मिता जोगी, कल्याणी पेंदोर या विद्यार्थ्यांनी स्वयंशासन राबविले.
अध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनपटावर मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाकरिता शिक्षक श्री. यु. बि.येपारी, कु.वंदना मत्ते, कु.नीलिमा रिंगणे व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले
.