आमला येथील सौ.मिनाताई रमेशराव वाघ यांना माणिक रत्न पुरस्काराने सन्मानित

सहसंपादक : रामभाऊ भोयर

    

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा खेड्यापाड्यात जावुन प्रचार व प्रसार करणे,स्वतः घरी शाळेकरी लहान लहान मुला मुलीना नियमित ग्रामगिता वाचन करुन समजावुन सागणे व नियमित प्रार्थना घेणे, गावोगावी जावुन राष्ट्रसंतांच्या कार्यक्रमात तन मन धनाने सहभागी होणे व मार्गदर्शन करणे ,गुरुकुंज मोझरी येथील कार्यक्रमाला गावातील भजन मंडळ सहभागी करणे.
गावात नेहमी सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असणे दिनदुबळ्याची सेवा व मदत करणे.गरिब रुग्न उपचाराकरिता कळंब येथील दवाखाण्यात नेण्यास मदत करणे.या सर्व कार्याची सौ मिनाताई रमेशराव वाघ यांची गुरुकुंज मोझरी येथेही दखल घेऊन त्यांना यवतमाळ जिल्हा महिला प्रमुख प्रचारक या मुख्य पदावर त्यांची नेमणुक करण्यात आलेली आहे.
सौ मिना रमेशराव वाघ ह्या कळंब तालुक्यातील आमला या छोट्याशा गावातिल रहिवाशी असुन त्यांच्या निस्वार्थ सेवेच्या कार्याची ग्राम स्वराज्य महामंच यवतमाळ यांनी दखल घेऊन त्यांना नुकत्याच दिनांक 19जानेवारीला वणी येथे या वर्षीच्या चौथ्या आव्रृतीच्या तुकड्यांची झोपडी या स्मरणिकेचे प्रकाशन व पुरस्कार प्रदान या भव्य कार्यक्रमात सौ.मिना वाघ यांना मा.प्रतिभाताई धानोरकर खासदार चंद्रपुर -वणी लोकसभा,मा.संजयभाऊ देरकर आमदार वणी विधानसभा,मा.अड.वामणराव चटप साहेब माजी आमदार राजुरा,मा.किरणताई संजय देरकर अध्यक्षा एकविरा नागरी पतसंस्था वणी,प्रा.मोहणजी वडतकर वर्धा,डा.रेखाताई निमजे नागपुर,मा.आशाताई काळे यवतमाळ,संचालक गिरीधर ससनकर सर राळेगाव,मा.मधुसुदन कोवे अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच,लक्ष्मणराव गमे सेवाधिकारी गुरुकुंज आश्रम मोझरी,देवराव धांडे शेतकरी नेते वणी,प्राचार्य डा.गांवडे,प्रा.राजेश कापसे वर्धा यांच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते माणिक रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असुन सौ मिना ताई वाघ यांचे सर्व स्थरातुन कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.