
वणी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मौजा मानकी येथे शनिवारी दि. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता गावातील तंटामुक्त समितीच्या वतीने शांतता बैठकीचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात केले. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष परशुराम पोटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
बैल पोळा, तान्हा पोळा, बडगा यासारखे सण उत्सव येत असता, कायदा व सुव्यवस्था आणि शांतता कशी अबाधित राहील व जातीय सलोखा कसा निर्माण होईल यावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी सरपंच कैलास पिपराडे, उपसरपंच शंकर माहुरे, सदस्य नानाजी पारखी, उमेश सावरकर, विठ्ठल सरवर, शंकर वासेकर, गुरुदेव चिडे, अनिल ठेंगणे, प्रतिक चिरुले, पोलिस पाटील सौ मिनाक्षी मिलमिले, अविनाश सरवर, अमर खुसपुरे उपस्थित होते.
