
राळेगाव दिवाणी तथा फौजदारी न्यायालय राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन दीं 09/09/2023 रोजी करण्यात आले होते,
त्यात, प्रमुख दिवाणी न्यायाधीश क स्तर साहेब राळेगाव, वि. वि. जटाळ साहेब, व दिवाणी न्यायाधीश क स्तर, डी. आर. कुळकर्णी साहेब, तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड प्रितेश वर्मा , सचिव ॲड गायत्री बोरकुटे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड मंगेश बोबडे, पॅनल सदस्य ॲड रोशनी वानोडे, ॲड संदेश झांबड, ॲड चेतन गलाट, ॲड आकाश कवडे, ॲड वैशाली मोंढे, ॲड रुपेश सागरकर हजर होते,
लोक अदालत मध्ये विविध बँक नी सहभाग घेतला होता त्यात, स्टेट बँक ऑफ इंडिया, विदर्भ कोकण बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, सेंट्रल बँक,
याव्यतिरिक्त तालुक्यातील जवळपास सर्व ग्रामपंचायती, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तर्फे त्यांचे अधिकारी उपिस्थित होते,
राळेगाव न्यायालयातील, सहाय्यक अधीक्षक किसन दातारकर, सुनील बोरसरे, निलेश तुरकर, शशिकांत ढाले, अमोल अडस्कर, प्रियंका तिडके, तुषार बागडे, देवानंद मेश्राम, शिल्पा सरगर, कुंदन मेश्राम, अरुण पारधी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष योगदान दिले,
लोकअदालत मध्ये एकूण
वाद पूर्व प्रकरण 3115 पैकी 429 निकाली 786501/- सेटलमेंट अमाऊंट
न्यायालयीन वाद प्रकरण 350 पैकी 250 निकाली 162650/- सेटलमेंट अमाऊंट
इतकी प्रकरणे निकाली निघाली.
