
,
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील जेष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या, सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांना स्व.प्राचार्य चंपतराव बुटे सर यांच्या 24व्या पुण्यस्मरणानिमित्त पुरस्कार देण्यात येत असून यावर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारात यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील पत्तीवार हायस्कूलचे शिक्षक ज्यांनी शिक्षक म्हणून 34 वर्षे शिक्षक त्यामध्ये मुख्याध्यापक म्हणून अडीच वर्षे कार्य केले त्याचसोबत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सैनिकापासून तर संघटनेचे पांढरकवडा तालुका कार्यवाह म्हणून यशस्वी व प्रामाणिकपणे कार्य केले असून सध्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे सर चांगल्याप्रकारे काम सांभाळत आहेत.सोबतच शाळेत कार्यरत असताना दरवर्षी वणी तालुक्यातील वेगाववरून पंढरपूर येथे जाणाऱ्या पालखीची व भाविकांची पांढरकवडा येथे भोजनाची व निवासाची व्यवस्था करत असून त्यांच्या भरीव कामगिरीची दखल घेऊन काटोल येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नागपूर विभागाचे आमदार सुधाकरराव अडबाले सर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन रामकृष्ण जिवतोडे सर यांना गौरविण्यात आले.त्यावेळी कार्यक्रमाला उद्घघाटक म्हणून मा. सुधाकरराव अडबाले सर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.चरणसिंग ठाकूर तर मा.दिनेश ठाकरे अध्यक्ष कृषी मित्र प्रतिष्ठान मा.विनोद राऊत, राज्य सल्लागार म.रा.सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्राथमिक शिक्षक महासंघ उपस्थित होते.हा सत्कार समारंभ दिनांक 10/9/2023 रोज रविवारला सकाळी 11 वाजता जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान जलतरण तलाव परिसर काटोल येथे घेण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन रमेश तिजारे अध्यक्ष,शामरावजी झामडे उपाध्यक्ष, गजानन भोयर, सचिव,अरूण पुंड सहसचिव,रूपराव राऊत कोषाध्यक्ष, पंजाबराव दुधाने संघटक सचिव व जेष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले असल्याची माहिती विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते सर यांनी दिली असून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यवतमाळ व मित्रपरिवाराकडून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
