चंद्रपूर जिल्हा व्यवसाय शिक्षकांचा विविध मागण्यासाठी विधानभवनावर धडकला एल्गार – समग्र मधील घोटाळ्याची चौकशी करणार- दीपक केसरकर

दिनांक २७ राज्यातील अतिदुर्बल व वंचित, आदिवासी विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुखकरून त्यांना
स्वयंरोजगार उपलब्ध करून देणाऱ्या व्यवसाय शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी राज्यातील हजारो व्यवसाय शिक्षक नागपूर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी धडक महामोर्चा काढण्यात आला होता, या महामोर्चामध्ये हजारो व्यवसाय शिक्षकांसह अनेक संघटना व समर्थक उपस्थित होते.राज्यात समग्र शिक्षा अंतर्गत व्यवसाय शिक्षण योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेची अंमलबजावणी व सनियंत्रणाची जवाबदारी असलेल्या समग्र कार्यालयामार्फत हि योजना शासनामार्फत पूर्णपणे अंमलबजावणी करावी, लेंड -ए-हँड इंडिया या कंपनीने डेटा चोरी करून विविध संस्थाना सादर करून अवैध मार्गाने करोडो रुपये सी एस आर फंड मिळवला याची एस आय टी मार्फत चौकशी करावी या प्रमुख मागणीसह राज्याबाहेरच्या विविध खाजगी कंपन्या व त्रयस्थ संस्था यांची नफेखोरी थांबावी व समग्र शिक्षा विभागात होत असलेला भ्रष्टाचार थांबवावा या मागण्यासाठी नागपूर विधानभवनावर चंद्रपूर जिल्हा व्यवसाय शिक्षक महासंघ यांच्या वतीने भव्य एल्गार पुकारण्यात आला होता, व्यवसाय शिक्षक विधानभवन परिसरातचं तीव्र उन्हामध्ये रस्त्यावर तब्बल ६ तास ठिय्या मांडून बसले होते, आंदोलनादरम्यान व्यवसाय शिक्षकांची एकमुखी मागणी असल्याने दीपक केसरकर यांनी तात्काळ २५ टक्के मानधन वाढीसह समग्र शिक्षा मधील टेंडर घोटाळा, व्यवसाय शिक्षकांचे नियमित वेतन, महिला व्यवसाय शिक्षिकांना प्रसूती रजा, बालसंगोपन रजा आदि मागण्याचे निवेदन स्वीकारून त्यावर योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासित केले. विद्यार्थ्यांच्या कौशल्याभिमुख व्यवसाय शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सुद्धा जाहीर केले. खाजगी कंपन्या व त्रयस्थ संस्था यांच्या समग्र शिक्षा मधील अधिकाऱ्याशी असलेले लागेबांधे व आर्थिक हितसंबध याचीही चौकशी करणार असल्याचे त्यांनी म्हटले. समग्र शिक्षा कार्यालयाच्या बाजारीकरण धोरणामुळे राज्यात शासकीय शाळेत माध्यमिक वर्गाना व्यवसाय शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय, समग्र शिक्षा मधील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी टेंडर काढून जे निकृष्ट साहित्य खरेदी केले त्याची एक चौकशी समिती नेमून दोषींवर कार्यवाही करणार असल्याचे दीपक केसरकरानी म्हटले. या वेळी राज्यातील हजारो शिक्षकांसह राज्याचे व्यवसाय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शोभराज खोंडे, विभागीय सहसचिव प्रफुल मूने ,चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आशिष राजनहिरे, सचिव राहुल सातपुते, कोषाध्यक्ष मयूर कश्यप, महिला संघटक मोनाली पाचघरे, गोविंद बंस्पाल, प्रतीक घोनमोडे, दिपाली चव्हाण, विनोद कामटकर, फिरोज शेमस्कर, शलाखा मेश्राम, रुपेश बुट्टे, संध्या गज्जल्वार, अश्विनी येवले, सपन खर्तडे, श्रद्धा शेंडे, राजेश वरुळकर, विशाखा खाडे, बंडू खैरे, रामेश्वर लाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.