

सहसंपादक : रामभाऊ भोयर
भरधाव वेगाने जाणाऱ्या कारसमोर अचानक रोही आडवा आल्याने झालेल्या अपघातात रोही जागीच ठार झाला तर कार रोडच्या कडेला जावून कारची तुटफुट झाली कारचालक गंभीर जखमी झाल्याची घटना वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लाडकी गावाजवळ दि १४ मार्च रोजी दुपारी अंदाजे च्या दरम्यान घडली आहे.
वडकी येथे जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक असलेले कांबळे सर हे आपल्या एम एच २९ बी पी ३७७५ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने यवतमाळ कडे जात होते. दरम्यान लाडकी गावाजवळ रोह्याचा कळप भरधाव वेगात आल्याने रोह्याला वाचविण्याच्या नादात चारचाकी रोही जागी ठार झाला तर कारने तीन पलट्या घेतल्या मात्र या झालेल्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कारचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती कळतच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे घटनास्थळावर दाखल होऊन जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल केले असून अधिक तपास पोलीस करीत आहे
