
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
शहरात दिनांक 15 मे 2026 रोजी राळेगाव येथील भाऊसाहेब कोल्हे सभागृह वसंत जिनिंग परिसर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व अभियान शिबिर समाधान संपन्न झाले सदर शिबिरात 30 विविध शासकीय निमशासकीय तसेच विविध सेवाभावी संस्था यांचे स्टॉल्स लावण्यात आले होते शिबिराची सुरुवात सकाळी नऊ वाजता प्रभात फेरी काढून करण्यात आली यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश असून सदर फेरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला हार अर्पण करून विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहभागाने काढण्यात आली. नंतर सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी राळेगाव यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले यावेळी मंचावर विविध विभागाचे विभाग प्रमुख तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित भोईटे तहसीलदार राळेगाव यांनी केले त्यानंतर तज्ज्ञांनी विविध विषयावर आपले मार्गदर्शन केले यावेळी राळेगाव मंडळातील शेकडो नागरिक उपस्थित होते व विविध विभागातर्फे दाखले प्रमाणपत्रे व इतर विभागाचे लाभ वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सूत्रसंचालन सानप यांनी पार पाडले.
तर शिबीर सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी राळेगाव, अमित भोईटे तहसीलदार राळेगाव,विकास कर्डीले अप्पर तहसीलदार राळेगाव यांचे मार्गदर्शनात शिबिर यशस्वी करण्याकरिता गाईड चव्हाण मंडळ अधिकारी राळेगाव सौरभ तुमस्कर, मिलिंद मडावी, अनिल ओंकार, बंडू तिरणकर,स्वर्णा उईके, ऐश्वर्या कुडमेथे सर्व ग्राम महसूल अधिकारी, अविनाश पेंदोर, मीना कुळसंगे, अमित बेताल, विठ्ठल किनवटकर सर्व महसूल सेवक यांनी आपला सहभाग नोंदविला.
