उपोषणाला बसलेल्या मुख्याध्यापिका सागर याना लिंबू सरबत पाजून उपोषणाची सांगता, अखेर निर्धारित जागेवरच होणार जलकुंभ

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वडकी येथील
वार्ड क्रमांक ४ मधील शिव नगरीच्या खुल्या जागेवर गावाची तहान भागविणसाठी जल कुंभाची निर्मिती जल जीवन मिशन या योजनेच्या माध्यमातून केली जाणार आहे. मात्र या जल कुंभ निर्माण कार्याला येथील स्मॉल वंडर कॉन्वेंन्टच्या मुख्याध्यापिका सागर यांनी कडाडून विरोध करीत गेल्या सोमवार पासून वडकी येथील ग्राम पंचायत लगत उपोषण सुरू केले होते त्यावर तोडगा काढून आज दिं २३ सप्टेंबर २०२३ रोज शनिवारला अखेर सहाव्या दिवशी विस्तार अधिकारी मस्के यांनी सरबत पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली आहे. दरम्यान उपोषणाच्या चौथ्या दिवशी सायंकाळी राळेगावचे तहसीलदार अमित भोईटे यांनी भेट दिली व मागण्या ऐकून घेतल्या होत्या यावेळी तहसिलदारांनी जल कुंभाच्या जागेची पाहणी केली. यावेळी पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी मस्के यांनी उपोषणकर्त्या मुख्याध्यापिकेला पत्र देऊन उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते व आज दिं २३ रोजी विस्तार अधिकारी व ग्रामसेवक तथा सरपंच सदस्यांच्या उपस्थित यावर तोडगा काढून ज्या जागेवर जलकुंभ उभारणं त्याच निर्धारित जागेवर बांधकाम होणार असून जलकुंभाच्या सभोवताल व खाली असलेल्या जागेवर वॉल कंपाऊंड घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले या विषयाला मुख्याध्यापिका यांनी ही सहमती दर्शविली व उपोषणाची सांगता करण्यात आली . यावेळी विस्तार अधिकारी मस्के , ग्राम सेवक ढगे, वडकीचे प्रभारी सरपंच शैलेश बेलेकर, उप सरपंच सागर इंगोले, उपस्थित होते.