
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
डिके प्रेझेन्ट कडून 23 ते 25 सप्टेंबर पर्यंत भारताच्या सर्वात मोठया नॅशनल
ब्युटी पेजेन्ट प्राइड ऑफ इंडिया,मिस,मिसेज व मिस टिन इंडिया2023 स्टेट विनर क्राऊनिग राऊंड चे आयोजन केले गेले,ज्यामध्ये सर्व देशभरातून वेगवेगळ्या राज्यातील आलेल्या विनर ची क्राऊन, ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन क्राऊनिग केली गेली ,सोबतच विजेत्या मुलींचे सुंदर ड्रेस मध्ये रॅम्प वॉक केले गेले . ज्यात महाराष्ट्रचे नेतृत्व करणारी राळेगाव ची प्रगती येसनसुरे हिला प्राईड ऑफ इंडिया मिस इंडिया 2023 चा मिस महाराष्ट्र फस्ट रनर अप स्टेट विनर च्या टाईटल ने सन्मानित केले गेले या सोबतच समोर होणाऱ्या नॅशनल लेवल क्राऊनिग साठी पात्र ठरली.असे डिके प्रेजेंट चे फाउंडर जिम्मी गरीमा यांनी सांगितले.
