
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण तालुका विधी सेवा समिती व उमेद संस्था ग्रामपंचायत रावेरी.यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील रावेरी येथे राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार संजय चोबे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा अशोक पिंपरे, ॲड. फिडेल बायदानी, समाजसेविका माधुरी डाखोरे उमेद संस्थेचे कोवे ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष सोनाली उताणे, श्यामलाल एडसकर यांची उपस्थिती होती महिलांना कायदेविषयक माहिती यावेळी उपस्थित याणि दिली महिला सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून बदलत्या काळात महिलांची सामाजिक भूमिका कशी राहील संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले तालुका विधी सेवा समितीच्या वतीने महिलांना वही व पेन देऊन सन्मान करण्यात आला शिक्षण घेऊन आपला सामाजिक स्तर व विकास साधावा अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त करण्यात आली. न्यायालयातील कर्मचारी सतीश देशपांडे अमोल अंद्रस, शशिकांत ढाले प्रियंका तिडके अरुण पारधी शिल्पा सरगर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता परिश्रम घेतले.
