
सहसंपादक : रामभाऊ भोयर
हिवरा( द. ) येथील बाबासाहेब दरणे यांची नात व कृ. उ. बा. स. संचालक सचिन दरणे यांची मुलगी अवनी सचिन दरणे (वर्ग 5 वा )हिने छत्रपती शिवाजी महाराज यांचे उत्कृष्ट चित्र काढले. खासदार संजय देशमुख यांच्या पर्यंत हे चित्र पोहचले त्यांनी या चिमुकलीच्या कलेचे कौतुक तर केलेच सोबतच बक्षीस देऊन तिचा हुरूप वाढवीला.
सत्कार व आभार कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार संजय देशमुख हिवरा (द.) येथे आले या वेळी कार्यक्रमा दरम्यान अवनीने काढलेल्या चित्राबाबत कुणीतरी माहिती दिली. त्यांनी छत्रपती शीवरायांचे ते चित्र पाहिले, स्वाक्षरी केली आणि अवनीच्या कलेचे कौतुक केले.या कलेबाबत आजी -आजोबा, आई – वडील, काका -काकु, शिक्षकवृंद व परिवारातील सर्वानी प्रोत्साहन दिल्याची प्रतिक्रिया कार्यक्रमा नंत्तर अवनी ने व्यक्त केली.सोबतच बक्षीस देखील दिले. या वेळी परिसरातील अनेक गावातील सामाजिक, राजकीय, कृषी क्षेत्रातील गणमान्य नागरीक उपस्थित होते.
