दोन दुचाकीच्या धडकेत दोन युवक ठार,दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने एक गंभीर जखमी

पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी :- आशिष नैताम

पोंभूर्णा:-कोठारी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या केमारा देवई रस्त्यावर समोरासमोर झालेल्या दोन दुचाकीच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.२९ जानेवारीला केमारा देवई मार्गावर घडली.जखमी ला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मृतकाचे नाव अशोक लक्ष्मण वेलादी वय ४२ वर्ष रा.देवई व स्वप्नील नरेश शेंडे वय २५ वर्ष रा.कोठारी असे आहे.

कोठारी पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या केमारा देवई रस्त्यावरील नाल्याजवळ समोरासमोर आलेल्या दोन दुचाकीची जबर धडक झाली.यात देवई येथील अशोक वेलादी याच्या डोक्याला व पायाला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर कोठारी येथील स्वप्नील शेंडे हा गंभीर जखमी असल्याने पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र प्रकृती नाजूक असल्याने त्याला तात्काळ चंद्रपूरला रेफर करण्यात आले.असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
तर काही वेळाने त्याच ठिकाणी दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने एक गंभीर जखमी झाले नवनाथ कुळमेथे वय ४० वर्षे असे जखमीचे नाव असुन पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती चिंताजनक असल्याचे त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
घटनेचा पुढील तपास कोठारी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तुषार चव्हाण करीत आहेत.