
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथे कालपासून डाॅक्टर नसल्याने रुग्नाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. तालक्यात संध्या ताप, खोकला, सर्दी अशा विविध आजाराची लागन सुरू आहे आज सकाळी वाढोणा बाजार येथे जवळपास संत्तर ते अंन्शी पेशंट दवाखान्यात आले पण तेथे एकच परिचारिका व दोन महिला कर्मचारी हजर होत्या विशेष म्हणजे बाकी सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते अधिकारी तसेच कर्मचारी हे अपडाऊन मध्ये आपला वेळ वाया घालवत असते. आज रोजी शुक्रवारी शाळकरी विद्यार्थी,शेतककरी हे उपचार घेण्यासाठी आले असता तेथे डाॅक्टर नसल्याने आर्थिक भुर्दंड सोसून खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावा लागला.त्यामुळे काही काळ येथे तनावाचे वातावरण निर्माण झाले होते . वाढोणा बाजार येथील प्रकाश पोपट यांनी प्राथमिक आरोग्य केद्रात येऊन अधिकारी तसेच कर्मचारी का हजर नाही याची सुद्धा उपस्थित कर्मचारी यांना विचारण्यात पण योग्य उत्तर मिळाले नाही जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा धिकारी यवतमाळ यांनी लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
