पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्याचा ढाणकी शहरात निषेध

प्रतिनिधी,प्रवीण जोशी.
ढाणकी.



सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे बघितल्या जाते अशा शांतताप्रिय देशाच्या पंतप्रधाना बद्दल पाकिस्तानच्या एका जबाबदार मंत्र्यांने वादग्रस्त वक्तव्य केले त्याचा निषेध ढाणकी शहरात करण्यात आला.
पाकिस्तानचे विदेश मंत्री यांनी नुकतच भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केले याच वक्तव्याचे निषेध म्हणून दिनांक 17 डिसेंबर, रोजी ढाणकी शहरातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवाजी चौकात पाकिस्तानच्या विदेश मंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.यावेळी पाकिस्तानच्या विरोधातील घोषणेने परिसर ढवळून निघाला. पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात चुकीचे वादग्रस्त वक्तव्य केल्याने संपूर्ण सर्वच स्तरातून पाकिस्तान बद्दल नाराजीचा सूर निघतो आहे. अशा या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेक ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली पाकिस्तानचे मंत्री बिलावल भुटो जरदारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात आपत्ती जनक वक्तव्य केल्यामुळे संपूर्ण देशातच या बाबीचा निषेध करण्यात येत आहे. भारताचे पंतप्रधान यांना विदेशात सुद्धा तितकाच सन्मान असताना अशा पद्धतीचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही असे यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सांगण्यात आले सद्यस्थितीत शहरातील शांततेचा भंग व कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी बिटरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार प्रताप भोस यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.