संस्कृती संवर्धन विद्यालय, राळेगाव येथे कवयित्री स्व. विजयाताई एंबडवार यांचा बारावा स्मृतिदिन संपन्न


राळेगाव :येथील संस्कृती संवर्धन महिला संस्था यवतमाळ द्वारा संचालित संस्कृती संवर्धन विद्यालय राळेगाव येथे वैदर्भीय कवियित्री तथा संस्थापिका स्व. विजयाताई एंबडवार यांचा बारावा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. जितेंद्रबाबू कोंघारेकर अध्यक्ष खविस. पांढरकवडा, तर प्रमुख पाहूणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक कवी मा. श्री. हेमंतकुमार कांबळे होते तर प्रमुख उपस्थिती मा. सर्वश्री नारायणराव काकडे, प्रवीणभाऊ कोकाटे, अरविंदभाऊ वाढोणकर, आशिषभाऊ कोल्हे, दिपकभाऊ एंबडवार, जानरावजी गिरी, कुंदनभाऊ कांबळे, हरिभाउजी पंढरपूरे, रवीन्द्रजी देशमुख, सुदामराव बलकी, कृष्णाजी राऊळकर, मनोहरराव केवटे, भैय्याजी माडेवार, गफ्फार सेठ, नामदेवराव काकडे, किरणभाऊ कुमरे, अंकुशराव मुनेश्वर, अजयराव बनकर, विशालजी फुलमाळी, मुख्याध्यापिका मिनाक्षी येसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्व. विजयाताई एंबडवार यांच्या प्रतिमापूजन व माल्यार्पणानंतर मान्यवरांचा स्वागतगीत व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मिनाक्षी येसेकर यांनी आपल्या प्रास्ताविकेतून स्व. विजयाताईंच्या स्मृतीस उजाळा देऊन मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी स्व. विजयाताई एंबडवार यांच्या स्वलिखित जाणिवा, बालजगत, शैला यामधून काव्यगायन केले.
यावेळी कार्यक्रमात जितेंद्रबाबू कोंघारेकार अध्यक्ष खविस पांढरकवडा, कवी-साहित्यिक हेमंतकुमार कांबळे, दिपकभाऊ एंबडवार आदी मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2023 मध्ये शाळेतून प्रथम कु. प्राजक्ता वागदे व द्वितीय कु. अनुष्का चाफले यांचा स्मृतिचिन्ह व स्व. बबूबाई दैवलकर यांच्या स्मुर्तीप्रित्यर्थ रोख देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आदर्श शिक्षक म्हणून तंत्रस्नेही शिक्षक श्री. दिनकर उघडे तर उपक्रमशील शिक्षिका कु. सीमा देशमुख यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मुर्तिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रधानमंत्री मा. नरेंद्रजी मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा 2023 मध्ये सहभागाबद्दल मानसी आडे, स्नेहा सोनटक्के यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. जागतिक भरडधान्य वर्ष 2023 निमित्त शालेय पोषण आहार अंतर्गत भरडधान्य-तृणधान्य निर्मित पाककला स्पर्धेत प्रथम दिक्षा नान्हे, द्वितीय प्रतीक धतकार, तृतीय वैष्णवी नागमोते यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यानंतर स्व.विजयाताई एंबडवार यांच्यासह आंतरभारती आश्रमाचे डॉ. भाऊसाहेब झिटे, सुबोधकुमार कांबळे, मोहनलाल गांधी, कवयित्री सुनितीताई भट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण जितेंद्रबाबू कोंघारेकार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन राकेश नक्षिणे तर आभार देवेंद्र मून यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मुख्याध्यापिका मिनाक्षी येसेकर, सीमा देशमुख, दिनकर उघडे, योगेश मिटकर, सलमा कुरेशी, ज्ञानेश्वरी आत्राम, मुकिंदा मानकर, भाग्यश्री काळे, विलास ठाकरे, प्रकाश अंबादे, अनंता परचाके यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी -पालक हजर होते.