नवदुर्गा उत्सव महिला मंडळ राळेगाव व नशाबंदी मंडळातर्फे पोस्टर प्रदर्शन व संकल्प व्यसनमुक्ती

नवदुर्गा महिला मंडळ राळेगाव व नशाबंदी मंडळातर्फे पोस्टर प्रदर्शन व संकल्प व्यसनमुक्ती

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

नवदुर्गा उत्सव महिला मंडळ राळेगाव व नशाबंदी मंडळातर्फे पोस्टर प्रदर्शन व संकल्प व्यसनमुक्ती केंद्र हिंगणा यांनी दारू पुराण या भरुडाच्या माध्यमातून व्यसनांचे दुष्परिणाम सांगून प्रबोधन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका गट शिक्षण अधिकारी सरलाताई देवतळे, प्रमूख अथिती अमित भुईटे,तहसीलदार साहेब, राळेगाव, रामकृष्ण जाधव, ठाणेदार साहेब पो. स्टे.राळेगाव, नगरसेवक बाळूभाऊ धुमाळ हे होते. समाज व्यसनमुक्त व्हावा याकरिता सर्व मान्यवरांनी विचार व्यक्त केले. व शुभेच्या दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता नव दुर्गा महिला मंडळाचे अध्यक्ष सौ राजश्री मडावी, उपाध्यक्ष सौ कल्पना ढोरे, सचिव सौ विजया ढगे, सुलभा विरुटकर, अरुणा भोयर, मेघा गलांडे,शीतल देवतळे, जोत्ना सोनटक्के,ममता भटकर,प्रणाली धुमाळ, छाया देवतळे,कल्पना डाखोरे, सुवर्णा खोकले, वनिता चौधरी,नयना वगळे,कांचन गिरडे,प्रिया ठूने,पल्लवी गलांडे,नम्रता कावरे,माकोडे,चौधरी सौम्या भटकर,योगेश रोकडे,महेश गलांदे यानी सहकार्य केले.
सूत्रसंचालन ॲड.सौ.रोशनी कामडी (वानोडे) व महेश ढोरे यानी केले.आभार प्रदर्शन सौ.कविता रोकडे यांनी केले.